अखिल दिगंबर जैन सैतवाल संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी तळागाळात जाऊन सभासद नोंदवा- अध्यक्ष दिलीपराव घेवारे

Sponsored

भारी बचत कार और फ्यूल दोनों पर - भाटिया एंड कंपनी बूंदी

मारुती सुजुकी S-CNG कार खरीदने पर अब CNG भरवाएं मात्र ₹ 76.22 per/kg की कीमत में, मार्केट रेट से ₹ 13.46 कम कीमत में | मारुती कार खरीदने पर भारी बचत | नियम और शर्तें लागू |

पाचोड( विजय चिडे) सैतवाल जैन समाजाचे पदाधिकारी यांनी जनगणनेच काम मोठ्या युद्ध पातळीवर सुरू असून बऱ्याच ठिकाणी जनगणनेचे काम जोरात सुरू आहे. त्याचबरोबर राज्यातील व परराज्यातील अखिल दिगंबर जैन सैतवाल संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी गावागावात जाऊन कार्यकर्त्यांनी गल्ली ते दिल्ली तील तळागाळात जाऊन सभासद नोंदणी करावी असे आवाहन अखिल दिगंबर जैन सैतवाल संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीपराव घेवारे यांनी रविवारी दुपारी पाचोड येथे सैतवाल जैन संस्थेच्या बैठकीत केले आहे.

     अखिल दिगंबर जैन सैतवाल संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीपराव घेवारे हे रविवारी छत्रपती संभाजी नगर हुन बीड कडे जात असताना वाटेत पाचोड येथे अखिल दिगंबर जैन सैतवाल संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक रविवारी आयोजित करण्यात आली होती यावेळी प्रारंभी या संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप घेवारे आपल्या भाषणात म्हणाले की आपण प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात कार्यकारणी तयार केलेले आहे आपण गल्ली ते दिल्ली पर्यंत पदाधिकाऱ्यांची नेमणूक केलेली आहे संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्व कार्यकर्ते राज्यातील प्रत्येक गावागावात जाऊन जैन समाजाची जनगणना करून घेत आहे या जनगणने पासून एकही जैन सैतवाल माणूस सुटता कामा नये असे आवाहन केले आहे राष्ट्रीय कमिटीतील पदाधिकारी आपल्या गावी हा एक अभिनव उपक्रम राबविणार असून राष्ट्रीय पातळीवरील पदाधिकारी खेड्यापाड्यातील शहरातील प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन सैतवाल संस्थेच्या कामाचा अहवाल त्यांना देणार आहे सैतवाल संस्था काय काम करत आहे याचा आढावा सुद्धा ते घेणार आहे गोरगरीब रुग्णांसाठी अखिल दिगंबर जैन सैतवाल संस्था मदत करणार असल्याचे सांगितले त्याचबरोबर राज्यातील प्रत्येक विभागातील उपाध्यक्ष व सचिव यांनी प्रत्येक महिन्याला आपापल्या विभागातील जिल्ह्यात बैठक घेऊन आढावा घ्यावा जनगणना बरोबर आपल्या सैतवाल जैन संस्थेच्या सभासद नोंदणी कडे ही प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे व सभासद नोंदणी घराघरात जाऊन करून घेण्याचे आवाहन सर्व जिल्हाध्यक्षांना केले आहे.

     सैतवाल जैन संस्थेच्या वतीने आपण गोरगरीब विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती वाटप करीत असतो जेणेकरून प्रत्येक गोरगरीब विद्यार्थी हा शिकला पाहिजे त्याने चांगले शिक्षण घेऊन उच्च पदावर नोकरी केले पाहिजे यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी शिष्यवृत्ती फंडासाठी प्रयत्न करावे असे आवाहन दिलीप घेवारे यांनी केले आहे.  यावेळी कार्यक्रमाला राष्ट्रीय मंत्री महावीर घोडके प्रवक्ता पवन अंबुरे , प्रमोद डेरे , राजेंद्र अवतारे , निलेश सावळकर , डी डी वायकोस , सुनील मेहत्रे , दीपक खोबरे आदी सैतवाल जैन समाजाचे पदाधिकारी हजर होते