मुरमा येथे महात्मा गांधी जंयती साजरी.

पाचोड (विजय चिडे)

पैठण तालुक्यातील मुरमा येथील ग्रामपंचायत कार्यालयात आज महात्मा गांधी जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. सर्वप्रथम ग्रामपंचायत सदस्य जगदिश बाबरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच यावेळी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त "तंबाखू मुक्त" ही शपथ घेण्यात आले आहे. यावेळी रोजगार सेवक दिनकर मापारी, ग्रामपंचायत सदस्य गणेश नेमाणे,ग्रा.प.गोपिंचद आहेर, पोलीस पाटील विश्वनाथ मगरे,ग्रा.प.संगणक चालक साईनाथ चिडे,शिपाई राजु भेरे, जालिंदर डवणे, एकनाथ मगरे, ज्ञानेश्वर आहेर, आशा कार्यकर्त्या जनाबाई मापारी, अंगणवाडी सेविका अनिता चिडे,मीरा साबळे/निर्मळसह आदी गावकरी उपस्थित होते.