नोव्हेंबरमध्ये बागेश्वर धाम यांचा दरबार भरणार छत्रपती संभाजीनगरात.
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी/
छत्रपती संभाजीनगर आध्यात्मिक गुरू बागेश्वर धाम बाबा पंडित धीरेंद्र कृष्णशास्त्री महाराज यांचा दरबार छत्रपती संभाजीनगर शहरात नोव्हेंबर महिन्यांतील ५ तारखेपासून ७ भरविण्यात येणार आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी मध्य प्रदेशातील छत्रपूर येथे जाऊन बागेश्वर महाराज यांची भेट घेऊन त्यांना शहरात येण्यासाठी साद घातली. या आध्यात्मिक कार्यक्रमासाठी १०० एकर परिसरात मंडप उभारण्यात येणार आहे. किमान दहा लाख भाविकांना बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.