औरंगाबाद: (दीपक परेराव)आवड आणि जिद्द असेल तर कितीही संकटे आले तरी त्यावर मात करण्याची देखील शक्ती मेहनतीतून मिळतेच. हेच गेले २५ वर्षाच्या कालावधीत अनेक संकटाना तोंड देत उभे राहिलेले उस्मानपुरा, संत एकनाथ रंगमंदिर समोरील असणारे भव्य असे दालन 'स्पेस कॉम्प्युटर्स' ने दाखवून दिले आहे. आज २५ वर्ष या संस्थेला पूर्ण होत असून त्यात अनेक संकटे आलेत त्यातून एक नवी शिकवण घेऊन स्पेस कॉम्प्युटर्स उभे राहिले. स्पेस कॉम्प्युटरचे संचालक संजय नामदेवराव गव्हाणे यांनी नवीन संकल्पना समोर आणून ग्राहकांना हव्या त्या सुविधा त्यांनी उपलब्ध करून देत मराठवाड्यातील हजारो ग्राहकांशी जोडले गेले.

असे उभे राहिले 'स्पेस कॉम्प्युटर्स संजय गव्हाणे यांनी इलेक्ट्रॉनिकमध्ये डिप्लोमा करून एका नामांकित कंपनीत मराठवाडा सर्व्हीस इंजिनिअर म्हणून अडीच वर्ष जॉब केला. ते करत असताना काहींना हार्डवेअर नेटवर्किंगचे ट्रेंनिग देखील त्यांनी दिले. त्यातच त्यांना व्यवसाय करण्याची आवड असल्याने घर भाडेतत्त्वावर असतानाही त्यांनी घरीच कम्प्युटर रिपेरिंग करणे सुरू केले. अशातच इंजिनिअरची संख्या खूप कमी होती. याशिवाय कॉम्प्युटर देखील खूप महाग होते. त्यातूनच स्पेस कॉम्प्युटर्सची संकल्पना समोर आली आणि संजय गव्हाणे यांनी १० ऑगस्ट १९९७ रोजी 'स्पेस कॉम्प्युटर्स' ची स्थापना केली. सुरेश दर्डा हे पहिले ग्राहक स्पेस कम्प्युटर्स सेंटरचे होते. त्यानंतर काम करत असताना अनेक अडचणी त्यांना आल्या. त्यात सुरुवातीला पैसे नसल्यामुळे ग्राहकांना वेळेवर सर्व्हिस देता येत नव्हते. परंतु हळूहळू त्यांनी चांगली सुविधा आणि गुणवत्ता ग्राहकांना उपलब्ध करून दिली आणि लोकांचा विश्वास जिंकला. त्यातूनच ग्राहकांशी जोडले गेले. याशिवाय स्पेस कॉम्प्युटर्सच्या कामाची दखल काही नामांकित कंपन्यांनी घेत ऑर्डर दिल्या. त्यामुळे अनेक कंपनीचे सर्व्हिस सेंटर भेटले. तसेच सेल देखील वाढत गेला. कॉर्पोरेट कामाबरोबर गव्हमेंटचे देखील कामे भेटली. औरंगाबाद शहरच नव्हे संपूर्ण मराठवाड्यातील असंख्य ग्राहकांशी ते जोडले गेले. एचसीएल, एचपी, डेल, लेनोवो, एसर सह आदी सेवा केंद्रांमध्ये चांगला अनुभव आहे. तसेच इतर विविध टेक्नो-उत्पादने, ग्लोबल सर्व्हिस, वारंटी प्रकारांची सेवा देण्याव्यतिरिक्त अत्यंत कुशल तांत्रिक व्यक्तींच्या टीमने सध्याच्या ग्राहकांसाठी नाविन्यपूर्ण उपाय उपलब्ध करून दिले आहेत. यामुळे स्पेस कॉम्प्युटर ऑफर करत असलेल्या विक्री, सेवा आणि सोल्यूशन्समध्ये ग्राहकांचा आत्मविश्वास वाढला आहे.

मराठवाड्यातले एकमेव शो रूम म्हणजे स्पेस कॉम्प्युटर्स. ज्या शो रूममध्ये एकाच छताखाली सर्व कॉम्प्युटरच्या एसेसिरीज उपलब्ध आहेत. ज्यात लॅपटॉप, डेक्स टॉप, टीव्ही, एसी, होम थेएटर, सीसीटीव्ही कॅमेरे, प्रिंटर सह आदी सर्व प्रकारच्या कॉम्प्युटरच्या एसेसीरिज उपलब्ध आहेत. १० ऑगस्ट १९९७ पासून स्पेस कॉम्प्युटर्स ग्राहकांच्या आवडीनुसार सेवा उपलब्ध करून देत आहे. कोरोनानंतर ऑनलाईन पध्दतीवर भर दिला गेला. आणि कॉम्प्युटर, लॅपटॉप, टॅबची मागणी देखील वाढायला लागली. ग्राहकांची ही गरज लक्षात घेत गेल्या आठ महिन्यापासून उस्मानपूरा भागात एकाच छताखाली सर्व कॉम्प्युटर एसेसिरीज उपलब्ध करून देण्यासाठी भव्य असे दालन उभारले गेले आहे. यामुळे ग्राहकांना आणखी चांगल्या प्रकारे सुविधा उपलब्ध करून दिल्या आहे. खर तर या आगोदर ज्योतीनगर त्यानंतर दशमेशनगर या ठिकाणी स्पेस कॉम्प्युटर्स सुरू केले होते. त्यानंतर आता उस्मानपुरा या ठिकाणी सुरू केले आहे. यातून आतापर्यंत अनेकांना रोजगार देखील उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे अनेक कुटुंबाला देखील यामुळे हातभार लागला आहे. या सर्व कामामध्ये संजय गव्हाणे यांना त्यांचे भाऊ अशोक गव्हाणे, राजेंद्र गव्हाणे, पत्नी शुभांगी गव्हाणे, बहीण मंगला काटकर आणि भावजी, मित्रमंडळीनी खूप सहकार्य केले.