शिरुर दिनांक ( वार्ताहर ) पर्यावरण पूरक गणेशोत्सवाच्या भाग म्हणुन येथील व्हीजन इंटरनॅशनल स्कूल शिरुर यांच्या वतीने तुरटीच्या गणेशमुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार असुन पर्यावरण पूरक गणेशोत्सावाचा आधिक प्रसार होण्याचा दृष्टीने समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पर्यावरण पूरक गणोशोत्सवात सहभाग वाढावावा याकरिता प्रतिष्ठापने करीता पर्यावरण पूरक गणेशमुर्ती देण्यात आल्या . ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे , प्रसिध्द उद्योगपती प्रकाश रसिकलाल धारीवाल यांचे गणेश मंडळ असणारे आडत बाजार गणेश मंडळ , शिरुर नगरपरिषद कामगार गणेश मित्र मंडळ , ऑक्सिगोल्ड गणेश मित्र मंडळ , नेत्ररोगतज्ञ डॉ .स्वप्ननील भालेकर ,आदीना या पर्यावरण पूरक गणेश मुर्ती देण्यात आल्या . यासंदर्भात माहिती देताना व्हीजन इंटरनॅशनल स्कूलचे प्रमुख विकास पोखरणा यांनी सांगितले की सध्या गोल्बल वार्मिग सह हवामान बदलाच्या प्रश्न गंभीर होवू लागला आहे . विविध प्रकारच्या प्रदूषणाने पर्यावरणाचे संतुलन बिघडत आहे. उद्याच्या पिढीसाठी चांगले पर्यावरण ठेवणे ही सर्वांची जबाबदारी आहे . मागील दोन वर्षापासुन पर्यावरण पूरक गणेशोत्सवाचा भाग म्हणून व्हीजन इंटरनॅशनल स्कूल शिरुर मध्ये तुरटी पासून बनविलेली गणेशमुर्ती बसविली जाते या गणेश मूर्तीचे पाण्यात विसर्जन केल्यावर नदीच्या पाण्याचे प्रदूषण न होता पाणी स्वच्छ होते . पर्यावरण पुरक गणेशोत्सावाचा प्रसार होण्यासाठी व्हीजन इंटरनॅशनल स्कुल शिरुरचा वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांना पर्यावरण पूरक गणेश मुर्ती देण्यात आल्या आहेत. आधिकधिक लोकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन पोखरणा यांनी केले आहे .आपले पर्यावरण वाचविणे ही आपली जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले . शाळेच्या मुख्याध्यापिका मिस पसक्वीन काशी , पालक शिक्षक संघाच्या प्रतिनिधी अलका बोरुडे आदी यावेळी उपस्थित होते . दरम्यान ज्येष्ठ्य समाजसेवक आण्णासाहेब हजारे यांना राळेगण सिध्दी येथे जावून ही पर्यावरण पूरक गणेश मुर्ती देण्यात आली .यावेळी व्हिजन इंटरनॅशनल स्कुलच्या विद्यार्थ्याने रेखाटलेले आण्णाचे चित्र ही देण्यात आले. आण्णासाहेब हजारे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले . यावेळी हजारे यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना सांगितले की ज्या क्षेत्रात काम करताल तेथे सेवाभाव जपा .कोणत्याही परिस्थितीत चुकीच्या व भ्रष्ट मार्गाच्या अवलंब करु नका असे सांगून उद्याची पिढी या विद्यार्थ्यान मधुन घडणार असल्याचे सांगितले . यावेळी व्हिजन इंटरनॅशनलच्या स्कुलच्या पर्यावरणपूरक उपक्रमांची माहिती विकास पोखरणा यांनी दिली. राळेगण सिध्दीचे माजी सरपंच लाभेश औटी व सागर सातारकर ,प्रा. सतीश धुमाळ उपस्थित होते . आडत बाजार गणेश मित्र मंडळास ही पर्यावरण पूरक गणेश मुर्ती देण्यात आली. प्रसिध्द उद्योगपती माजी नगराध्यक्ष व मंडळाचे मार्गदर्शक प्रकाश धारीवाल व मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र लोळगे यांनी मुर्तीचा स्वीकार केला . मंड्ळाचे कार्यकर्ते बाळु कोठारी , राजू बच्चूवार यांच्यासह मध्यकांत पानसरे , बंटी चोपडा ,प्रा सतीश धुमाळ आदी उपस्थित होते . शिरुर नगरपरिषद कामगार गणेश मंडळास ही पर्यावरण पूरक गणेशमुर्ती देण्यात आली . शिरुर नगरपरिषदेचे कार्यालयीन अधीक्षक अय्युबभाई सय्यद ,स्वच्छ्ता व पाणीपुरवठा विभागाच्या आधिकारी राजश्री मोरे व भगवान दळवी यांनी ही मुर्ती स्वीकारली. यावेळी माजी उपनगराध्यक्ष ॲड .दिलिप करंजुले , बबन कांबळे ,आप्पा पोटघन आदी उपस्थित होते .

Sponsored

भारी बचत कार और फ्यूल दोनों पर - भाटिया एंड कंपनी बूंदी

मारुती सुजुकी S-CNG कार खरीदने पर अब CNG भरवाएं मात्र ₹ 76.22 per/kg की कीमत में, मार्केट रेट से ₹ 13.46 कम कीमत में | मारुती कार खरीदने पर भारी बचत | नियम और शर्तें लागू |