शिरुर दिनांक ( वार्ताहर ) समाजाला एकत्र आणण्यासाठी उत्सव असतो .सण उत्सव आपल्या सर्वांच्या आयुष्यात आनंद घेवुन येवो अश्या अपेक्षा अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांनी शिरुर येथे व्यक्त केल्या . गणेश उत्सव व ईद ए मिलाद च्या निमिताने अप्पर पोलीस अधीक्षक मीतेश घट्टे ,उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप यादव , नायब तहसिलदार स्नेहा गिरीगोसावी ,शिरुर नगरपरिषद कार्यालयीन अधीक्षक अय्युबभाई सय्यद , महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे बेसुलखे , माजी नगराध्यक्ष नसीम खान , भाजपाचे तालुकाध्यक्ष प्रदीप सोनवणे , ,इक्कबालभाई सौदागर , माजी नगरसेवक मुजफ्फर कुरेशी , शोभना पाचंगे , कॉग्रेस आयच्या प्रियंका बडगर , माजी सरपंच विठ्ठल घावटे , लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष राजेंद्र लोळगे ,शशिकला काळे , वैशाली गायकवाड , नोटरी रवींद्र खांडरे ,वर्धमान रुणवाल , राजेंद्र गोपाळे  व शासकीय विभागाचे प्रमुख यांचे उपस्थितीत शांतता कमिटी ची बैठक तहसील कार्यालय येथे आयोजित करण्यात आली होती . यावेळी घट्टे म्हणाले की गणेशोत्सवात अनेक नवीन कलाकराना कला सादर करण्याची संधी मिळत असते . गणेशाची विविध रुपे या कलेतून कलाकार सादर करीत असतात . समाजातील वंचित व व विकासापासून दूर असणा-यांना सुखाची सावली देणारे उपक्रम ही काही गणेश मंडळ करीत असतात . गणोशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीच्या बदलत्या स्वरुपावर ही त्यांनी भाष्य केले . आपल्यातील बेजबाबदार वर्तन एखाद्याच्या आयुष्यात अंधार पसरवु शकतो त्यामुळे जबाबदारीने वागावे असे सांगुन ते म्हणाले की उत्सव काळात कोणत्याही प्रकारचा विसंवाद नसावा . पोलीसांच्या वतीने गणेशोत्सव निमित्त गणेश मंडळासाठी देखावा सजावट स्पर्धा घेण्यात येणार आहे . स्वच्छता ,शिस्त ,सामाजिक कार्यक्रम , विसर्जन मिरवणुकीतील शिस्त ,जातीय सलोख्या शासनाच्या आचारसंहितेचे पालन अश्या आठ मुद्दाच्या आधारे गणेश मंडळांसाठी स्पर्धा ठेवण्यात येणार आहे . जातीय सलोख्या ,भाईचारा वाढविणारा हा सण आपल्या आयुष्यात आनंद घेवुन येवो अश्या अपेक्षा ही घट्टे यांनी व्यक्त केल्या . पोलीस उपअधीक्षक यशवंत गवारी म्हणाले की देखावे जास्त उंचीचे करु नयेत. सामाजिक व विधायक उपक्रम गणेश मंडळाने राबवावेत . यावेळी पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी प्रास्ताविक केले त्यात ते म्हणाले की मागील वर्षी शिरुर शहरात १७७ गणेश मंडळे होती . ऑनलाईन परवानगी उत्सवा संदर्भात गणेश मंडळानी घेतली आहे . शिरुर शहरातील विसर्जन मिरवणुक मार्गाची पाहणी करण्यात आली असुन या संदर्भात असणा-या अडचणी दूर करण्यात येतील .गणेश मंडळानी वाहतुकीला अडथळा ठरणार नाही यानुसार मंडप टाकावेत याबाबत सुचना देण्यात आल्या आहेत व स्पिकर परवानग्या घेण्याबाबतही सुचना देण्यात आले आहेत .दुहीची भावना वाढणार नाही एकोपा वाढेल असे देखावे व कार्यक्रमाचे आयोजन करावेत .जबाबदारीची जाणिव ठेवुन सलोख्याने उत्सव साजरा करावा असे ही जगताप म्हणाले . महाराष्ट्र राज्य वीज वितरणचे इंजिनिअर्स चे बेसुलखे म्हणाले की गणेश मंडळानी वीजेचे जोड गणेशोत्सवा करीता घ्यावे वीजेच्या प्रश्न निर्माण होणार नाही असे ते म्हणाले . शिरुर नगरपरिषदेचे कार्यालयीन अधीक्षक अय्युबभाई सय्यद म्हणाले की गणेशोत्सवानिमित्त शहरातील रस्त्यांची डागडुजी करण्यात येत असुन विसर्जन घाट परिसराची स्वच्छता करण्यात येत आहे . यावेळी माजी नगराध्यक्ष नसीम खान ,जनता दलाचे जिल्हाध्यक्ष संजय बारवकर , ,माजी उपनगराध्यक्ष जाकिरखान पठाण , मराठा सेवा संघाचे नामदेवराव घावटे, पोपटराव शेलार ,बाजीराव येळे , प्रा चंद्रकांत धापटे , सामाजिक कार्यकर्ते रवींद्र सानप , भाजपाचे विजय नरके , सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब आवारी ,आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष अनिल डांगे , मनसेच्या डॉ वैशाली साखरे , सुदर्शन दरेकर प्रा डॉ . ईश्वर पवार ,प्रा सतीश धुमाळ आदीनी विविध सूचना मांडल्या .

    फोटो ओळी- गणेश उत्सव व ईद ए मिलाद च्या निमिताने शिरुर येथे आयोजित केलेल्या बैठकीत बोलताना अप्पर पोलीस अधीक्षक मीतेश घट्टे ,उ