गणेशोत्सव शांतेत साजरा करा-सपोनि-संतोष माने 

पाचोड विजय चिडे/ सर्वांच्या आवडत्या गणेशोत्सव हा मंगळवार पासुन सुरुवात होत आहे.तरी गणेशोत्सव शांतेत साजरा करण्यात यावा याकरीता गणेश उत्सवानिमित्त पाचोड पोलिस ठाण्यांच्यावतीने रविवारी (दि.१७) सांयकाळी शांतता कमिटीची बैठक सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने, उपनिरीक्षक सुरेश माळी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती. 

या बैठकीमध्ये बोलताना सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने हे असे म्हणाले की, गणेशही बुद्धीची देवता असून या गणेशाच्या उत्सवाचे पावित्र्य व निर्माल्य राखले गेले पाहिजे गणेश उत्सवात जुगार- दारू अशी वातावरण भ्रष्ट गोष्टी करू नयेत उत्सवाला गालबोट राहणार नाही असे कोणीही वागू नये व गणपतीच्या कार्यकाळामध्ये समाज प्रबोधन कार्यक्रम एकांकिका असे इतर कार्यक्रम असावे गणपती समोर हा जुगार अड्डा होऊ नये याची काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे.यावेळी पाचोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व पोलीस पाटील गणेश मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष हे मोठ्या संख्येने उपस्थित होते.