शिरुर दिनांक ( वार्ताहर )विज्ञान भारती पुणे आयोजित आंतरशालेय  राज्यस्तरीय  प्रश्न मंजुषेत  शिरूरमधील  आर. एम . धारीवाल इंग्लिश  मिडियम  स्कुल,शिरूर च्या विद्यार्थ्यांना पाचवे बक्षिस मिळाले आहे.

सदर स्पर्धेचा विषय सामान्य ज्ञान,भारताच्या स्वातंत्र्यात लोकमान्य टिळकांचे शास्त्रीय दृष्टीने योगदान असा होता . इयत्ता ८ वी व ९वीचे एकूण ९ विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले पैकी कु. केतकी पाटील,श्लोक ठोसर,नैतिक चोपडा, व आसामी गदादे या विद्यार्थ्यांची पहिल्या पाच मध्ये निवड झाली.एकूण ६७ शाळा सहभागी झाल्या होत्या त्यातील ६६ शाळा पुण्यातील होत्या .

 या सर्व विद्यार्थ्याना प्रशालेच्या शिक्षिका  पाटील रश्मी व जोशी वैशाली यांनी मार्गदर्शन केले. सर्व विजेत्या विद्यार्थ्याचे प्रशालेच्या मुख्याध्यापिका आश्विनी घारू, शि .शि .प्र. मंचे सचिव  नंदकुमार निकम,शालेय समितिचे चेअरमन शिरिष बरमेचा, सदस्य  धरमचंद फुलफगर ,  राजेंद्र भटेवरा,  शिरिष गादीया यांनी सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.