शिरुर दिनांक ( वार्ताहर ) येथील सिताबाई थिटे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात महिंद्रा प्राईड क्लासरूम यांच्या संयुक्त विद्यमाने *"कौशल्यवृद्धी प्रशिक्षण"* ही सहा दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. विद्यार्थिनींचे सक्षमीकरणासाठी प्रामुख्याने विद्यार्थिनींसाठी या कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेसाठी विद्यार्थिनींना नांदी फाउंडेशनच्या तज्ञ प्रशिक्षक कु.रोहिणी ढगे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. ४ सप्टेंबर ते ९ सप्टेंबर या दरम्यान ही कार्यशाळा आयोजित केली होती.या कार्यशाळेसाठी अंतिम वर्षाच्या विद्यार्थिनींनी नोंदणी केली होती. यामध्ये प्रामुख्याने प्रोफेशनल ग्रुमिंग, गोल सेटिंग अँड टाईम मॅनेजमेंट, प्रोफेशनल कम्युनिकेशन, डिजिटल आयडेंटिटी, क्रिटिकल थिंकिंग,ग्रुप डिस्कशन आणि प्रेझेंटेशन स्किल्स या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक करताना अशा पद्धतीच्या कार्यशाळेचा निश्चितच विद्यार्थ्यांना फायदा होईल असे मत महाविद्यालचे प्राचार्य डॉ. डी. जी. बाहेती यांनी व्यक्त केले. या कार्यशाळेचे आयोजन ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. प्रियांका वांजूळ यांनी केले. या कार्यशाळेच्या आयोजनात डॉ. एम. एस. तारे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यशाळेच्या आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र थिटे, सचिव  धनंजय थिटे, समन्वयक  शिवाजीराव पडवळ, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले .