घरोघरी तिरंगा हा कार्यक्रम फक्त भाजपचाच नसुन भारत देशावर प्रेम करणाऱ्या संपूर्ण नागरिकांचा आहे. --खासदार अशोक नेते
७५ व्या अमृत महोत्सवानिमित्त भारतीय जनता पार्टी गडचिरोली शहर यांची महत्त्वपूर्ण बैठक
भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावर विश्वास ठेवुन अनेकांनी केला भाजप प्रवेश
भाजपात प्रवेश करणाऱ्यांचे केले स्वागत
गडचिरोली--दि.०८ ऑगस्ट:+देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी थोर महात्मे,करांतीकारी यांनी आपले बलिदान देवुन देशाला स्वातंत्र्य मिळवुन दिले.स्वातंत्र्य मिळून आज ७५ वर्ष पूर्ण होत आहेत.अमृत महोत्सवा निमित्त घर घर तिरंगा हा उपक्रम फक्त भाजपचाच नसुन तो संपुर्ण भारत देशावर प्रेम करणाऱ्या नागरिकांचा आहे. १३ ऑगस्टला भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोली, युवा मोर्चा व महिला आघाडीच्या वतीने गडचिरोली शहरात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन केले आहे.तरी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन खासदार अशोकजी नेते यांनी केले.
भारतीय जनता पार्टी गडचिरोली शहराच्या वतीने स्थानिक पत्रकार भवन मध्ये घरोघरी तिरंगा या अभियानांतर्गत महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन केले होते यावेळी उदघाटक म्हणुन ते बोलत होते.
आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी शहरातील जे बुथ कमजोर आहेत ते बुथ सक्षम करावे असे पदाधिकारी व बुथ प्रमुखांना सुचना दिल्या.
आगामी निवडणूकीच्या संभाव्य उमेदवारांनी तसेच कार्यकर्त्यांनी आपल्या प्रभागामध्ये १३ ते १५ ऑगस्ट रोजी सरकारच्या नियमावलीचे पालन करून घरोघरी तिरंगा फडकवावा,१४ ऑगस्ट फाळणी दिन,विभाजक विभिषिका म्हणुन साजरा करावा.असे आवाहनही प्रमोद पिपरे यांनी आपल्या प्रास्ताविक मध्ये केले.
यावेळी मंचावर शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे,किसान आघाडी प्रदेश सदस्य रमेशजी भुरसे,माजी नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे,भाजपा जिल्हा सचिव गीताताई हिंगे,माजी नप उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, सुरेश मांडवगडे,गोवर्धन चव्हाण,शहर महामंत्री विनोद देवोजवार, केशव निंबोड उपस्थित होते.
दिनांक १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या तिरंगा यात्रेच्या सांदर्भामध्ये युवा मोर्चाचे शहर महामंत्री अनिल तिडके यांनी बैठकीतील उपस्थितांना विस्तृत माहिती दिली.
भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेतृत्वावर विश्वास ठेवून भावनाताई उत्तम हजारे रामनगर,पायलताई श्रीकांत कोडापे आयटीआय परिसर,संगीताताई कुळमेथे,कौशल्याबाई बंजारा,शेखर गडसुलवार यांनी भारतीय जनता यांनी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवा मोर्चा शहराध्यक्ष सागर कुंभरे यांनी केले.