जिंतूर : जालना जिल्ह्यातील अंतरवाली येथे मराठा समाजाच्या आरक्षण मागणीसाठी उपोषणास बसलेल्या महिला,पुरुष यांच्यावर अमानुष लाठीहल्ला, आश्रुधूर चा वापर करून शांततेत आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला.यामध्ये आंदोलक माता - भगिनी,लहान मुले यांच्यावर अमानुष लाठीहल्ला करून हवेत गोळीबार करत त्यांना धमकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या जालना जिल्ह्यातील पोलिस, गृहमंत्री,आणि सरकार च्या जाहीर निषेधार्थ जिंतूर तालुक्यातील पाचेगाव येथे जिंतूर औंढा महामार्गावर आज दि. 3 सप्टे. रोजी सकाळी 10 ते 10:40 या वेळेत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शांततापूर्ण पद्धतीने आंदोलन करणाऱ्या समाजावर अमानुष लाठीहल्ला करणाऱ्या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करावे अशी मागणी निवेदनाद्वारे तहसील जिंतूर मार्फत मा.मुख्यमंत्री यांच्या कडे करण्यात आली आहे.यावेळी जिंतूर तहसील चे प्रशांत राखे,जगन घुगे यांनी निवेदन स्वीकारले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त करण्यात आला होता.सकल मराठा समाज पाचेगाव यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी पाचेगाव सह परिसरातील ही मराठा समाज आंदोलनामध्ये सहभागी झाला.शांततेत रास्ता रोको झाल्यानंतर जिंतूर पोलिस स्टेशन चे पो.नि. अनिरुद्ध काकडे यांनी सकल समाज बांधवाना आरक्षणासाठी शुभेच्छा देऊन शांततेत आंदोलन पार पाडले म्हणून आभार व्यक्त केले.