जामखेड-पैठण बस पाचोडच्या बस स्थानकांत येऊन 'दे धक्का बस'

पाचोड(विजय चिडे)

परिवहन महामंडळाच्या बसमध्ये अचानक बिघाड झाल्याने बस पाचोडच्या बसस्थानकात अचानक बंद पडली. बस चालू करण्यासाठी चक्क प्रवाशांना खाली उतरून बसला धक्का मारावा लागला, त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. मंगळवारी (दि.८)रोजी सकाळीच पाचोडमध्ये प्रवाशांना तोंड द्यावे लागले. सकाळी सातची जामखेड-पैठण ही पाचोड बस जामखेड येथुन येवून पाचोड बसं स्थानकात अचानक बंद पडली. बस चालकाने बस चालू करण्यासाठी भरपूर प्रयत्न केलेत, मात्र बस चालू झाली नाही. त्यामुळे बसमधील प्रवाशांना चक्क बसला चालू करण्यासाठी धक्का मारावा लागला. यांचाच फटका ज्येष्ठ नागरिकांना बसत असुन त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. तरी परिवहन महामंडळाने बसेस मध्ये दुरुस्ती करीत प्रवाशांना चांगल्या बसेस उपलब्ध करुन द्याव्यात अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.