शिरुर दिनांक ( वार्ताहर) रांजणगाव एमआयडीसी मधील कल्याणी टेक्नो फोर्स लिमिटेड कंपनीचे शॉप चे बाहेर केव्हि सेक्शन 132 च्या मोकळ्या जागेतून ४० हजार ८०० रु किमंतीचे लोखंडी बार अज्ञात चोरट्याने चोरुन नेले आहेत . यासंदर्भात पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी सचिन दत्तात्रय शिवले वय 34 वर्षे व्यवसाय – नोकरी रा. शिक्रापूर तळेगाव रोड एस एस प्लाझा ता. शिरुर जि.पुणे यांनी अज्ञात अज्ञात चोरटा विरोधात फिर्याद दिली आहे . 07 ऑगस्ट 2023 रोजी कारेगाव गावचे हद्दीतील रांजणगाव एमआयडीसी मधील टेक्नो फोर्स कंपनीचे शॉप चे बाहेर केव्हि सेक्शन 132 च्या मोकळ्या जागेतून लोखंडी बार चोरट्याने चोरुन नेले . याप्रकरणी आधिक तपास पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सरजीने करीत आहेत .