शिरुर दिनांक ( वार्ताहर ) येथील संतोष शिवाजीराव शितोळे यांची पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाली आहे . राष्ट्रवादी कॉग्रेसचे  ( अजितदादा पवार ) जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप गारटकर  यांनी शितोळे यांना निवडीचे पत्र दिले आहे . शितोळे परिसरातील विविध संस्था संघटना यात कार्यरत आहे . शिरुर नगरपरिषद शिक्षण मंडळाचे ते माजी सभापती असुन त्याच्या पत्नी  सुरेखा शितोळे या जिजामाता महिला सहकारी बॅकेच्या उपाध्यक्षा आहेत  शिरुरच्या माजी नगरसेविका ही होत्या . निवडीबद्दल शितोळे यांचे तालुकाध्यक्ष रवींद्र काळे ,शहराध्यक्ष शरद कालेवार आदीनी त्यांचे अभिनंदन केले आहे .