शिरुर दिनांक  ( वार्ताहर )  व्यापाराचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. व्यापारी वर्गाने पोलीस प्रशासनास  सहकार्य करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी केले . आखिल एकता उद्योग व्यापार मंडळ दिल्ली यांच्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्त व्यापारी संघटनेच्या प्रतिनिधीची बैठक मंडळाचे उपाध्यक्ष प्रवीण भंडारी यांनी आयोजन केले होते . यावेळी संघटनेच्या वतीने शिरुरचे नवे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या सन्मान करण्यात आला. बैठकीत जगताप यांनी व्यापारी वर्गाचे विविध प्रश्न जाणून मार्गदर्शन केले . यावेळी बाजार समितीचे सचिव अनिल ढोकले ,बाजार समितीचे माजी उपसभापती प्रवीण चोरडिया ,बंडु जाधव ,अभय बरमेचा ,दिलीप कोठरी, अजय चोरडिया , नितीन भंडारी , प्रेम मुसळे ,प्रीतम चंडालिया , नेमीनाथ कर्नावट , नीलेश पिपाडा ,मनिष कोठारी ,अतुल लुंकड ,अतुल बोथरा , कपिल बोरा ,पवन लुंकड, विजय नरके , बाळुशेठ देसारडा ,प्रीतेश गादीया ,पोलीस कर्मचारी राजेंद्र गोपाळे ,शंकर चव्हाण आदी उपस्थित होते . जगताप यावेळी म्हणाले की बाजार समिती प्रवेशद्वारा लगत बसणारे विक्रेते यांनी बाजार समितीच्या आतील बाजुस बसावे प्रवेशद्वार  मोकळे ठेवावे असे सांगून शहरातील  वाहतुकी संदर्भातील समस्या दूर करण्यात येतील. रोड रोमिओवर ही कारवाई करण्यात येत आहे . व्यापारानी ही त्याना असणा-या अडचणी सांगाव्यात त्या सोडण्याचा प्रयत्न करण्यात येईल. यावेळी प्रास्ताविक प्रवीण भंडारी यांनी केले त्यात त्यानी आखिल एकता व्यापार मंडळाच्या कार्याची माहिती दिली .आभार नितीन भंडारी यांनी मानले .

यावेळी वृक्षरोपनासाठी झाडे ही देण्यात आली .