शिक्रापुरात इंस्टाग्राम मधील ओळखीतून महिलेवर बलात्कार

फोटो व्हायरल करण्याची धमकी व गरोदर महिलेचा केला गर्भपात

( शिक्रापूर प्रतिनिधी ) शिक्रापूर ता. शिरुर इंस्टाग्राम मधून झालेल्या ओळखीतून महिलेच्या वाढदिवसाच्या दिवशी महिलेसोबत फोटो काढून फोटो महिलेच्या पतीला दाखवण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार करुन महिला गरोदर असताना तिचा गर्भपात केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे राहुल संभाजी झगडे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

                              शिक्रापूर ता. शिरुर येथील पिडीत महिलेची राहुल झगडे याच्या सोबत इंस्टाग्राम मधून ओळख झालेली असताना दोघे एकमेकांशी बोलत होते, त्यानंतर महिलेच्या वाढदिवसाच्या दिवशी राहुल केक घेऊन महिलेच्या घरी आला त्याने महिलेसोबत फोटो काढून घेतले, त्यानंतर महिलेच्या पतीला सदर फोटो दाखवण्याची धमकी महिलेला देऊन महिलेवर अत्याचार करत महिलेचे पुन्हा फोटो काढून घेतले, दरम्यान वारंवार महिलेला फोटोची धमकी देऊन महिलेवर अत्याचार सुरु केला, महिलेच्या काही कारणास्तव तिच्या पतीसोबत वाद होऊ लागल्याने तू पतीला घटस्पोट दे असे देखील राहुल हा महिलेला वारंवार बोलू लागला, दरम्यान महिलेला पोटात त्रास जाणवू लागल्याने तिला हॉस्पिटलमध्ये नेले असता ती गरोदर असल्याचे समोर आल्याने राहुल याने वेगवेगळ्या गोळ्या महिलेला खायला देऊन महिलेचा गर्भपात देखील केला, त्यांनतर महिलेचे फोन घेणे बंद करुन महिलेचा नंबर ब्लॉक केला, राहुलशी संपर्क होत नसल्याने महिला त्याच्या कुरकुंभ येथील घरी गेली असता राहुलच्या घरच्या लोकांनी पिडीत महिलेला दमदाटी करुन हाकलून दिले, याबाबत पिडीत महिलेने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने शिक्रापूर पोलिसांनी राहुल संभाजी झगडे रा. झगडेवाडी कुरकुंभ ता. दौंड जि. पुणे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक माधुरी झेंडगे या करत आहे.