साहित्यिक प्रा. कुंडलिक कदम यांना वाचनयात्री पुरस्कार जाहीर
- वाचन साखळी समूहावर केले शंभर पुस्तकांचे उत्कृष्ट पुस्तक परिचय
आकाश भोरडे
तळेगाव ढमढेरे प्रतिनिधी:
तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील स्वातंत्र्य सैनिक रायकुमार बी. गुजर प्रशालेमध्ये अध्यापनाचे कार्य करत असणारे साहित्यिक प्रा.कुंडलिक कदम यांना वाचन साखळी समूहातर्फे दिला जाणारा वाचनयात्री पुरस्कार नुकताच जाहीर झाला असल्याची माहिती वाचन साखळी समूहाच्या संयोजिका प्रतिभा लोखंडे यांनी दिली.
साहित्यिक प्रा.कुंडलिक कदम यांनी 'शिदोरी' व 'लग्नाचा बार' या दोन कथासंग्रहाचे लेखन केले असून विविध पुस्तकांचे वाचन करत अल्पावधीतच तब्बल शंभर पुस्तकांचे उत्कृष्ट परीक्षण वाचन साखळी समूहामध्ये केले आहे. समाजामध्ये वाचन साखळी समृद्ध करण्यास तसेच अनेकांना पुस्तके वाचनासाठी प्रेरित करण्यास त्यांचे मोलाचे योगदान आहे. दरवर्षी वाचन प्रेरणा दिनानिमित्त परिसरातील एका वाचकाचा ते सन्मान करत असतात. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना वाचन यात्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. वाचन साखळी समूहातर्फे दिल्या जाणाऱ्या वाचनयात्री पुरस्काराचे ते पाचवे मानकरी असुन आजवर त्यांना मराठी साहित्यातील विपुल लेखनाबद्दल स्वर्गीय संभाजीराव करंजे उत्कृष्ट ग्रामीण साहित्य पुरस्कार, आदर्श शिक्षक पुरस्कार, युवा साहित्यिक पुरस्कार यांबरोबरच विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.