शिरुर दिनांक ( वार्ताहर )शिरुर पोलीस स्टेशनच्या वतीने रोड रोमिओच्या विरोधात धडक कारवाई सुरु करयात आली असुन वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन ही पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात आले आहे .

       नूतन पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी १७ जुलै रोजी  उपनिरीक्षक एकनाथ पाटील,सहाय्यक फौजदार अनिल चव्हाण,सहायक फौजदार  गणेश देशमाने,पोलीस हवालदार नितीन सुद्रीक, पोलीस नाईक राजू वाघमोडे,पोलीस अंमलदार राजेंद्र गोपाळे,संतोष साळुंखे,शेखर झाडबुके,अर्जुन भालसिंग,प्रवीण पिठले,नितेश थोरात,महिला पोलीस नाईक भाग्यश्री जाधव यांच्या समवेत कॉलेज रोड वरून येणारे जाणारे रोड रोमियो ,ट्रिपल शिट,विना लायसन गाडी चालविणे,विना नंबर प्लेट,ब्लॅक फिल्मलिंग यांचे वर दंडात्मक कारवाई केली.

तसेच लहान मुले गाडी चालवीत असताना कारवाई दरम्यान सापडल्याने त्यांचे पालकाना बोलावून एक वेळ समज देऊन सोडण्यात आले आहे . वाहतूक नियमनाचे उल्लंघन करणारे 75 व्यक्तीवर कारवाई करून 83,000 हजार रुपये दंड वसूल करण्यात आलाआहे .

पोलीस स्टेशन ने नागरिकाना  व पालकांना आवाहन केले आहे की   वाहतूक नियमांचे पालन करावे . 18 वर्ष पेक्षा लहान असल्यास पाल्यास  वाहन चालवण्यास देऊ नये. 

अश्या प्रकारच्या कारवाई नियमित पणे करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी सांगितले .