विहीरीत पडुन महिलेचा मृत्यू

चिमुकल्यावरून आई चे छत्र हरपलं,

"पैठण तालुक्यातील मुरमा येथील घटना"

पाचोड प्रतिनिधी/

विहीरीवर पाणी शेंदण्यासाठी गेलेल्या एका पस्तीस वर्षी विवाहीत महीलेचा विहीरीत पडुन मृत्यू झाल्याची घटना मुरमा ता.पैठण येथे (दि.१७)रोजी सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास उघडकीस आली असून छाया भरत मापारी (वय३५) रा.मुरमा असे मृत झालेल्या महीलेचे नाव आहे.

याविषयी सूत्रांकडुन भेटलेल्या माहीतीनुसार,

पैठण तालुक्यातील मुरमा येथील भरत मापारी व त्याची पत्नी छाया मापारी हे सोमवारी सकाळी घरुन जेवण करून घरगुती कामे आटोपून स्वतः शेतात शेतपिकावर फवारणी करण्यासाठी गेले होते. अकराच्या दरम्यान शेतातील फवारणी औषध आणण्यासाठी भरत हा त्यांच्या अडीच वर्षाच्या चिमुकल्यास घेऊन पाचोड येथे औषध खरेदी करण्यासाठी आला होता. त्यावेळी छाया मापारी या विहिरीवर पाणी शेंदत होत्या.भरत हा औषध घेऊन आला परंतु त्यास पत्नी छाया ही शेतात दिसली नाही. त्यामुळे त्यांनी आजूबाजूला शोधा शोध घेतला. परंतु, त्या कुठंही आढळून आल्या नसल्याने त्यांनी तात्काळ विहिरीवर जाऊन पाहीले असता त्यांच्या लक्षात आले की, छाया ही विहीरीत पडली. यावेळी त्यांनी तत्काळ या घटनेची माहिती गावातील नागरिकांसह पोलीस पाटील विश्वनाथ मगरे यांना कळविले असता त्यांनी तात्काळ पाचोड ठाण्यांत या घटनेची माहिती दिली असता बीट जमादार ए.एल. बागवान यांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करून गावकऱ्यांच्या मदतीने छाया यांचा मृतदेह विहिरी बाहेर काढून पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ.चौरे यांनी मृत घोषित करून त्यांच्यावर उत्तरीय तपासणी करण्यात आली आहे. याप्रकरणी पाचोड पोलीस ठाण्यांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार गोंविद राऊत सह ए.एल.बागवान हे पुढील तपास करीत आहेत.

चौकट-चिमुकल्यावरून आईचे छत्र हरपलं. छाया यांना दोन मुली व एक अडीच वर्षाच्या चिमुकला असल्याने त्याच्या बालपणीच त्यांच्या आईचे छत्र हरपलं असल्याने परिसरातील सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.