शिरुर दिनांक ( वार्ताहर )

शिरूर पोलीस स्टेशनचे  पोलीस निरीक्षक  म्हणुन संजय जगताप यांनी सुत्रे स्वीकारली आहेत .

या अगोदरचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राउत यांची सोलापूर येथे बदली झाल्याने त्याच्या जागी कदम यांनी सूत्रे स्वीकारली . जगताप यापूर्वी कामशेत  येथे पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते .

दरम्यान पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पोलीस निरीक्षक जगताप यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक  संदीप यादव,पीएसआय  एकनाथ पाटील,पीएसआय अभिजित पवार व 20 पोलीस अंमलदार यांना सोबत घेऊन शिरूर शहरामधील प्रमुख बाजारपेठ ,पाचकंदील चौक, डंबेनाला,मुंबई बाजार,मार्केट यार्ड,बस स्थानक इथे रूट मार्च करून पेट्रोलिंग केले  व याच प्रकारे दर दिवशी शिरूर शहरामध्ये,बाबुरावनगर शिरूर ग्रामीण या ठिकाणी पायी पेट्रोलिंग केले  जाणार असल्याचे सांगितले .