शिरुर दिनांक ( वार्ताहर ) भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) ने चांद्रयान  अवकाशात सोडले. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण डेक्कन एज्युकेशन सोसायटी इंग्लिश मिडीयम स्कूल येथील विद्यार्थ्यांनी एकत्रित पाहीले .

या वेळी विदयार्थ्यांना चांद्रयान मोहिमेची माहिती देणारी चित्रफीत दाखविण्यात आली. बरोबर 2:37 वाजता चांद्रयान  अवकाशात झेपावले व विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला.  शाळेचे प्राचार्य डॉ समीर ओंकार  चंद्रकांत झांजे,  अमोल वाघमारे,  सखाराम पुरी, रत्नमाला महाजन,  सुनीता सरोदे यांनी  या  कार्यक्रमाचे विद्यार्थ्यांसाठी आयोजन  केले होते .