शिरुर दिनांक ( वार्ताहर ) शिरुर मर्चट आर्थिक निधी लिमिटेडचा प्रथम वर्धापन दिनाच्या औचित्याने शहरातील नगरपालिका शाळामधील विद्यार्थ्याना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले . शिरुर नगरपालिका शाळा क्रमांक १ते ७ या शाळेतील विद्यार्थ्याना शालेय दप्तर ,वह्या , कंपासपेटी व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले . याप्रसंगी एस बॅकेचे शिरुर शाखाधिकारी शरद ढोमे , शरद सहकारी बॅकेचे शिरुर शाखाधिकारी जितेंद्र सकट , मनसेच्या शिरुर महिला आघाडी प्रमुख डॉ वैशाली साखरे , रामलिंग पतसंस्थेचा राणी कर्डिले ,सरपंच संदिप तरटे , जिजामाता सहकारी महिला बॅकेचे शिवाजी औटी ,नासीर शेख ,बारामती सहकारी बॅक शिरुरचे शाखाधिकारी सुहास जाधव , जय जस्धव  निकेश आढाव , शाळांव्हे शिक्षक ,शिक्षीका आदी उपस्थित होते . निधी अर्बनचे शाखाधिकारी इस्त्राइल शेख यांनी सांगितले की सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातुन विद्यार्थ्याना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले असुन भविष्यातही सामाजिक उपक्रम राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले . फोटो ओळी शिरुर निधी अर्बन लिमिटेड चा प्रथम वर्धापनदिनानिमित्त शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले .