सेनगाव शहर युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने परमेश्वर इंगोले यांचा तहसील परिसरात सत्कार..

हिंगोली जिल्ह्यातील सेनगांव शहरातील तहसील परिसरामध्ये दि.11 जुलै मंगळवार रोजी सेनगांव शहर युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने परमेश्वर इंगोले यांची राष्ट्रवादीच्या युवक प्रदेश सरचिटणीसपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस सेनगाव शहराध्यक्ष सत्यम देशमुख , ओम शिंदे , सुयोग चाटसे, अवधूत गडदे ,राजू वाणी यांच्यासह पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.