सोलापूर - पंचायत समिती कुर्डुवाडी, ता. माढा येथील ग्रामसेवकाने लाचेची मागणी केल्याप्रकरणी प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे.
हणुमंत उध्दव कदम, वय ४४ वर्षे,(राहणार मु.पो. घाटणे, ता. माढा, जि. सोलापूर) असे त्या ग्रामसेवकाचे नाव आहे.
यातील तक्रारदार याचे मित्र हे कंत्राटदार असुन त्यांच्या मित्रांनी मौजे उजनी, ता. माढा येथे शासकीय योजनेतील १५ व्या वित्त आयोगांतर्गत पालखी मार्गातील रस्त्याच्या केलेल्या सिमेंट कॉक्रेटीकरणाच्या कामाचे बिला संदर्भात तक्रारदार पाठपुरावा करीत होते. सदर कामाच्या बिलाची रक्कम खात्यात जमा केली बाबत ग्रामसेवकाने तक्रारदार यांच्याकडे एकूण बिलाच्या ३ टक्के प्रमाणे ८ हजार ४०० रुपयांची लाचेची मागणी केल्याचे पडताळणीत स्पष्ट झाल्याने ग्रामसेवकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले असून कुर्डूवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची काम सुरू आहे.