शिरुर दिनांक ( वार्ताहर) आविष्कार या सामाजिक व शैक्षणिक संस्था फाउंडेशन च्या वतीने लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या १४९ व्या जयंती निमित्ताने कोल्हापूर येथे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्य करित असलेल्याना राज्य व राष्ट्रीय पातळीवरील लोकराजा राजर्षी शाहू गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून गुवाहाटी (आसाम) येथील समाज सेवक व असामी साहित्यीक पंकज वैश्य हे होते अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघ मुंबई चे अध्यक्ष प्रा किसनराव कु - हाडे हे होते. छत्रपती संभाजीनगरचे निवृत्त विशेष पोलिस महानिरीक्षक अजित पाटील तसेच रयत शिक्षण संस्थेच्या दक्षिण विभागाचे चेअरमन डॉ. एम. बी. शेख उद्योगपती संजय भगत, चित्रपट निर्माते सुनील साळुंखे, व आविष्कार फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय पवार, सोलापूरचे सहायक पोलिस आयुक्त दिपक आर्वे, हे उपस्थित होते यावेळी अकोला (विदर्भ ) येथील सरला देवेंद्र शेंडे यांना महिला कृषि उद्योजक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .मसाला उत्पादक संघटनेच्या अध्यक्षा असून महिला सक्षमीकरण अंतर्गत उद्योजिका घडविण्यात त्याचे योगदान आहे त्याच बरोबर परिसरातील विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमात ते सहभागी होत असतात .