शिरूर  दिनांक( वार्ताहर )  प्रविण मसालेवाले ट्रस्ट पुणे या उद्योग समुहाचे संस्थापक स्व. हूकमचंद (भाऊ) चोरडिया यांच्या प्रथम स्मरणार्थ पुणे जिल्ह्यातील सर्व शासनमान्य ग्रंथालयांना ग्रंथसंच भेट  देण्याचा  उपक्रम हाती घेण्यात आला  आहे.      गुरूवर्य कै. गो.ना. वाघ स्मृती वाचनालयाच्या सभागृहात पुणे जिल्हा ग्रंथालय संघ व शिरूर तालुका ग्रंथालय संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शिरूर तालुक्यातील ४८ ग्रंथालयांना जिल्हा व तालुका ग्रंथालय संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते ग्रंथसंच प्रदान करण्यात आले. यावेळी पुणे जिल्हा ग्रंथालय संघाचे प्रमुख कार्यवाह सोपानराव पवार, जिल्हा संघाचे सदस्य हमीद तांबोळी, शिरूर तालुका अध्यक्ष विवेकानंद फंड तसेच शिरूर तालुक्यातील शासनमान्य ग्रंथालयांचे अध्यक्ष,सचिव, ग्रंथपाल तसेच संचालक मंडळ  उपस्थित होते.

यावेळी सोपानराव पवार म्हणाले की प्रविण मसालेवाले ट्रस्टच्या उपक्रमाने ग्रंथालय चळवळीस पाठबळ मिळाले  आहे . खासदार , आमदार व अन्य पदाधिकारी यांनी ग्रंथालय चळवळ वाढविण्यास त्यांच्या निधीचा वापर करावा. त्यामुळे तरूणांत वाचनाची गोडी निर्माण होईल व वाचन संस्कृती जतनाचे कार्य घडून येईल. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सेवा निवृत्त शिक्षणाधिकारी नानासाहेब पवार, गुरुवर्य कै. गो. ना. वाघ स्मृती वाचनालयाचे पदाधिकारी अविनाश  वाघ, माजी मुख्याध्यापक  व्ही.डी.कुलकर्णी ,लक्ष्मीकांत कुलकर्णी हे उपस्थित होते.शिरूर तालुक्यातील सर्व वाचनालयाचे अधिकारी, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हमीद तांबोळी, शंकर गव्हाणे, संतोष काळे,धोंडीभाऊ जाधव, तुकाराम रासकर यांनी आपले कार्यक्रमाच्यानिमित्ताने आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रविण मसालेवाले ट्रस्टचे समन्वयक पोपट काळे तर सुञसंचालन चैतन्य वाघ यांनी केले, शिरूर तालुका ग्रंथालय संघाचे अध्यक्ष श्री विवेकानंद फंड यांनी सर्वांचे आभार मानले.