शिरूर दिनांक ( वार्ताहर) तांदळी - निर्वी रस्त्यावर तांदळी येथे अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत सायकलस्वार ठार झाला .अपघातात ठार झालेल्याचे नाव अनिल कचरू बरडे वय 35 वर्षे रा. गांधलेमळा, इनामगाव ता. शिरूर जि. पुणे असे आहे . याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार अजय सुरेश बरडे यांनी अज्ञात वाहनावरील अज्ञात चालका विरोधात फिर्याद दिली आहे . तांदळी , ता शिरुर येथे तांदळी ते निर्वी रस्त्यावरील बाजीराव भागुजी अडसुळ यांचे विटभट्टीजवळ हा अपघात झाला . अनिल कचरू बरडे हे सायकलीवरून तांदळी बाजुकडुन इनामगाव बाजुकडे घरी येत असताना त्यांचे सायकलीला पाठीमागुन येणारे कोणत्यातरी अज्ञात वाहनाने धडक दिली .त्यात ते मरण पावले .यासंदर्भातील आधिक तपास पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार कदम करीत आहेत .