शिरुर दिनांक ( वार्ताहर ) जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन च्या निमित्ताने जनजागृती साठी विद्याधाम प्रशाला येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप यादव,पोलीस उपनिरीक्षक एकनाथ पाटील ,पोलीस उपनिरीक्षका स्नेहल चरापले , रवींद्र सानप ,प्रवीण गायकवाड , राजेंद्र गोपाळे आदी उपस्थित होते . कोणत्याही प्रकारचे अमली पदार्थांचे व्यसनाचे आहारी न जाता उज्वल भविष्यासाठी उच्च ध्येय बाळगा व आयुष्यात यशस्वी व्हा याबाबतचे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले .