आंबे बहार मोसंबी फळगळीवर तात्काळ उपयोजना हाती घ्याव्यात ...

तालुका कृषी अधिकारी शिरसाठ यांचे आवाहन..

पाचोड; मागील महिनाभरातील पावसाने पैठण तालुक्यात विविध ठिकाणी आंबे बहार मोसंबी मध्ये फळगळीची समस्या उद्भवली असून शेतकऱ्यांनी उपायोजना कशा करायच्या याबाबत कृषी अधिकारी कार्यालय पैठण यांच्यावतीने शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले होते.या अंतर्गत वडवाळी, शृंगारवाडी, आनंदपुर, पैठण आखातवाडा, ढोरकिन, धनगाव या गावांमध्ये तालुका कृषी अधिकारी संदीप शिरसाठ यांच्या नेतृत्वात मंडळ कृषी अधिकारी विशाल साळवे कृषी पर्यवेक्षक किशोर पाडळे यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन मोसंबी पडगळ विषयक उपायोजनांविषयी माहिती दिली,यावेळी शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन करतेवेळी मंडळ कृषी अधिकारी विशाल साळवे यांनी खालील उपाययोजना शेतकऱ्यांनी हाती घेण्याचे आवाहन केले आहे१) मोसंबी बागेत पावसाचे पाणी साचून राहू देऊ नये चर काढावेत,२) सध्या सततच्या पावसामुळे अन्नद्रव्यांची कमतरता निर्माण झाली असून झाडांमध्ये संप्रेरकांची निर्मिती थांबली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी तात्काळ नॅनो युरिया 30 मिली +प्लेनोफिक्स (एन ए ए) 3 मिली दहा लिटर पाण्यातून फवारणी करावी.३) यानंतर १०-१५ दिवसाच्या अंतराने बुरशीजन्य रोगांसाठी (रिडोमिल गोल्ड) मेटलेक्झिल+मॅन्कोझेब संयुक्त बुरशीनाशक 25 ग्रॅम+ रस शोषण करणाऱ्या किडी करिता रोगर 15 मिली दहा लिटर पाण्यातून फवारावे ४) बागेतील वासनवेल गुळवेल वेली नष्ट कराव्यात अथवा फवारून घ्याव्यात.यावेळी वरील सर्व गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते, तसेच कृषी सहाय्यक सचिन खरात, बी जे साबळे, बी जे नजन, एस बी अकोलकर, चंद्रकांत कुसळकर उपस्थित होते

छाया: मोसंबी फळांची झालेल्या गळतीची पाहणी करतांना तालुका कृषी अधिकारी सह कर्मचारी दिसत आहे(छाया-विजय चिडे,पाचोड)