बीड प्रतिनिधी / दि.08 येत्या 13 ऑगस्ट 2022 ते 15 ऑगस्ट 2022 पर्यंत घर घर तिरंगा या केंद्र शासनाच्या योजने अंगर्तत गावो गावी जागृती रथ शासनाच्या वतीन काढण्यात येणार आहेत. या स्थावर विशिष्ट धर्माचे प्रतिकं लावण्यात आलेले आहेत. भारतीय संविधानाच्या उद्देशिके नुसार भारत हा धर्म निरपेक्ष देश आहे. म्हणुन कोणत्याही शासकीय कामकाजा मध्ये किंवा योजने मध्ये कोणत्याही जाती धर्माच्या देव धर्माचे फोटो किंवा प्रतिके लावणे हे नियम बाह्य आहे. परंतु केंद्र सरकार वारंवार विशिष्ट धर्माचा प्रचार शासनाच्या माध्यमातुन करीत आहे. त्याचा बहुजन समाज पार्टीच्या वतीने जाहिर निषेद करण्यात येतो.

दिनांक 13 ऑगस्ट 2022 पासुन काढण्यात येणाऱ्या रथ यात्रेला तात्काळ स्थगिती देऊन रथ यात्रे मध्ये लावण्यात आलेले बॅनर बदलुन त्या बॅनरवर देशाच्या स्वातंत्र्या करीता ज्या-ज्या स्वातंत्र्य विरांनी संघर्ष केला व स्वतः च्या प्राणाचे बलीदान दिले. अशा स्वातंत्र्य विरांचे फोटो लावावेत

'देशा मध्ये तिरंग्या बाबत जागृती करण्याची शासनाला काहीही आवश्यकता नाही कारण राष्ट्र ध्वजा बाबत देशातील प्रत्येक व्यक्तीला सन्मान व स्वभीमान आहेच. या ऐवजी घर घर रोजगार व घर घर रोटी हि योजना शासनाने करणे आवश्यक आहे परंतु यांचेकडे शासन जाणीव पुर्वक डोळे झाक करीत आहे.

क तरी स्वातंत्र्य दिना निमित्त काढण्यात येणाऱ्या रथ यात्रेला तात्काळ स्थगिती देऊन त्यावर विण्यात येणाऱ्या बॅनरवर सर्व स्वातंत्र्य सैनिकांचे व भारतीय संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो छापण्यात यावे. अन्यथा स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी बहुजन समाज पार्टीच्या वतीने तिव्र अंदोलन करण्यात येईल.