सणसवाडी ता. शिरुर येथे पुणे नगर महामार्गावरुन विरुद्ध दिशेने जाणाऱ्या दुचाकीची समोरून आलेल्या दोघा दुचाकी चालकांना धडक असून दोघे दुचाकी चालक जखमी झाल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे सुरेंदर नागसाई मराबी या दुचाकी चालकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

                              सणसवाडी ता. शिरुर येथील पुणे नगर महामार्गावरून परमेश्वर लोंढे हे त्यांच्या ताब्यातील एम एच १२ जि यु ४३५६ या दुचाकीहून तर आकाश शीरमुरे हे त्यांच्या ताब्यातील एम एच २५ ए यु ०५३२ या दुचाकीहून पुणे बाजूने अहमदनगर दिशेने येत असताना समोरून सुरेंदर मराबी हा त्याच्या ताब्यातील एम एच १२ बी ए ३५९२ या दुचाकीहून विरुद्ध दिशेने आला यावेळी सुरेंदरची समोरून आलेल्या दोघा दुचाकिंना धडक बसून दोघे दुचाकी चालक जखमी झाले, तर दोन्ही दुचाकींचे नुकसान झाले यामध्ये परमेश्वर नागनाथ लोंढे व आकाश प्रकाश शीरमुरे हे दोघे जखमी झाले असून याबाबत पोलीस शिपाई अंबादास अश्रुबा थोरे वय २७ वर्षे रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी दुचाकी चालक सुरेंदर नागसाई मराबी वय १९ वर्षे रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. अंदरी ता. रजनीग्राम जि. अनकपूर मध्यप्रदेश याच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक राकेश मळेकर हे करत आहे