संगणक क्षेत्रात करिअरच्या असंख्य संधी - प्राचार्य डॉ. चंद्रसेन कोठावळे

पाचोड / येथील शिवछत्रपती महाविद्यालय आणि शिवछत्रपती कॉम्प्युटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिराचे( दि.१९) आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. चंद्रसेन कोठावळे यांनी भूषविले तर मुख्य मार्गदर्शक म्हणून एम.के. सी.एल. चे एम आय योगेश उबाळे यांनी मार्गदर्शन केले, बदलत्या जगात आय. टी. क्षेत्रात होत असलेली क्रांती आणि आपले करिअर त्या क्षेत्रात कसे बनवता येईल या बद्दल उबाळे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवछत्रपती कॉम्प्युटर्स चे संचालक दादासाहेब एखंडे यांनी केले. त्यात त्यांनी आय टी मधील कमाईचे स्त्रोत विद्यार्थ्यांना स्पष्ट करून दिले. तसेच प्राचार्य डॉ. कोठावळे यांनी आयुष्यात येणाऱ्या अडचणीचे दर्शन घडवून दिले व त्यावर मात करण्याचे सामर्थ्य स्वतःत कसे विकसित करून घेता येतील या बद्दल विद्यार्थ्यांना उद्बोधित केले. या कार्यक्रास प्राचार्य अप्पासाहेब नेमाने व प्रेरणा टायपिंगचे वैभव घायाळ यांची देखील प्रमुख उपस्थिती लाभली होती. या कार्यक्रमास शेकडो विद्यार्थी उपस्थित होते, त्या पैकी पायल जाधव या विद्यार्थिनीने आपले मनोगत व्यक्त करताना अनेक अपिरीचीत विषयांची ओळख झाल्याचे सांगितले. संचालक एखंडे यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता झाली.