सिध्देश्वर मठपती-धर्माबाद (प्रतिनिधी)

Sponsored

भारी बचत कार और फ्यूल दोनों पर - भाटिया एंड कंपनी बूंदी

मारुती सुजुकी S-CNG कार खरीदने पर अब CNG भरवाएं मात्र ₹ 76.22 per/kg की कीमत में, मार्केट रेट से ₹ 13.46 कम कीमत में | मारुती कार खरीदने पर भारी बचत | नियम और शर्तें लागू |

धर्माबाद कंदाकुर्ती या राष्ट्रिय महामार्गावरुन आज पहाटे सुमारे पाच वाजता धावत असलेल्या भरधाव वेगवान अज्ञात वाहनाने धडक दिल्याने बेलूर बुद्रुक येथील अश्विनी नागनाथ भूमकर वय 28 या महिलेचा जागीच मृत्यू झाला असून या प्रकरणी धर्माबाद पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन व वाहन चालक विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरील महा मार्गावरुन रेती व मुरुमाची ओव्हरलोड भरधाव वाहने रोज धावत आहेत यावर महसूल विभागाने कोणताही आवर घालण्यासाठी प्रयत्न केला नसल्याने वाहनांची संख्या दिवसेदिवस वाढतच चालली आहे.

आज 19 जून रोजी पहाटे अज्ञात वाहनाने धडक दिल्याने बेलूर बुद्रुक येथील एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे.या प्रकरणी धर्माबाद पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन व वाहन चालक विरुद्ध कलम 279, 304 अ भा द वी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.काँ मुनलोड हे करीत आहेत.

धडक देऊन पळून गेलेले वाहन कोणते होते?त्याचा चालक कोण ? व त्या वाहनातून नेमकी काय वाहतूक सुरू होती याचा शोध पोलीस घेत आहेत.

प्राथमिक माहिती मिळताच धर्माबाद पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन व वाहन चालक विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.