शिरुर  दिनांक ( वार्ताहर )

शनि अमावस्येनिमित्त शहरतील लाटेआळीतील शनि मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती . शिरुर शहरात लाटेआळीतील घोडनदीच्या जवळ माहेश्वरी समाजाचे शनिदेवाचे पुरातन मंदिर आहे . शनि अमावस्येनिमित्त सकाळ पासूनच शनि मंदिरात भाविकांनी गर्दी केली होती भाविकांना दर्शन सुलभ व्हावे याकरिता दर्शनबारीची व्यवस्था करण्यात आली होती त्याच बरोबर मंदिर परिसरात भाविकांसाठी मंडपाची व्यवस्था करण्यात आली होती .सकाळी धार्मिक विधी व आरती झाली .दिवसभर मंदिरात भाविकांसाठी शाबुदाणा खिचडीच्या महाप्रसादाचे वाटप करण्यात आले होते . मंदिरातील दैनदिन पूजा व धार्मिक विधी रवींद्र गोसावी करतात . भविष्यात शनि मंदिराच्या जीर्णोध्दार करण्यात येणार असल्याचे माहेश्वरी समाजाचे संदिप बिहाणी व पकंज बिहाणी यांनी सांगितले .