शिरुर दिनांक  ( वार्ताहर )पुणे अहमदनगर महामार्गावर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ज्येष्ठ नागरीक ठार झाले . अपघातात ठार झालेल्याचे नाव अंकुश शिवराम दुर्गे वय - ६५ रा फलके मळा , कारेगाव , ता शिरुर , जि पुणे असे आहे . याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार हा अपघात आज दुपारी १ च्या सुमारास झाला दुर्गे हे रस्त्याने जात असताना पुणे नगर रस्त्यावर अज्ञात वाहनाने त्याना धडक दिली त्या धडकेत गंभीर जखमी होवून ते मरण पावले . दुर्गे यांच्या पश्चात पत्नी , दोन बंधु , दोन विवाहित मुली , एक मुलगा , नातवंडे असा परीवार आहे अपघात प्रकरणी अविनाश चौधरी यांनी फिर्याद दिली आहे .