छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालयाची डागडुजी करण्याची मागणी 

छ.संभाजीनगर (विजय चिडे) छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालयाची डागडुजी करण्यात यावे यासाठी आज Nsui शहर अध्यक्ष,सचिव यांच्या वतीने महानगर पालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात असे म्हटले की,छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास जतन करण्यासाठी आपल्या शहरात असलेले भव्य असे वस्तूसंग्रालय आहे,अनेक पर्यटक मोठ्या आस्थेने महाराजांचा इतिहास बघण्यासाठी येत असतात मात्र त्याची झालेली दुर्दशा त्याकडे प्रशासनाने कानाडोळा केल्याचं दिसून येत,बाहेर गार्डन मध्ये असलेले झाडाचे ओटे त्याची पडझड झालेली आहे,गार्डन साफसफाई नाही,आमच्या मागण्या पुढील प्रमाणे. वस्तूसंग्रहालयाचे स्लॅब गळत आहे त्याचे रंगरंगोटी चे काम,स्वच्छलाय अस्वच्छ असतात त्यातून दुर्गंध पसरत आहे व स्वच्छलाय ची डागडुजी,हॉल मधील पंखे,लाईट बंद आहे ते नवीन बसवण्यात यावे,वस्तूसंग्रहालय बघायला येणाऱ्या पर्यटकांना स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करावी,आमची अस्मिता असलेल्या शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालयाची कामे आपण लवकरात लवकर करावी अन्यथा महानगरपालिका दालनात आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला यावेळी NSUI काँग्रेस छत्रपती संभाजीनगर शहर अध्यक्ष दिक्षा पवार, जिल्हाध्यक्ष मोहित जाधव,युवक काँग्रेस शहर अध्यक्ष सागर नागरे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते