शिरुर दिनांक ( वार्ताहर ) सर्व सामान्याना केंद्रबिंदु मानून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार काम करित असुन लोकहिताच्या अनेक योजना शासनाने कार्यान्वित केल्या असल्याचे शिरुर लोकसभा मतदार संघाचे भाजपाचे प्रभारी आमदार महेश लांडगे म्हणाले . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाचा कार्यकाळास नउ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल विशेष जन अभियान आंबेगाव शिरुर विधानसभा मतदार संघ भाजपा यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते . या अभियान अंतर्गत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी भाजपाचे जिल्हा संघटन सरचिटणीस ॲड .धमेंद्र खांडरे ,शिरुर आंबेगाव विधानसभा मतदारसंघ भाजपा प्रभारी जयश्री पलांडे , सतीश पाचंगे , बाळासाहेब चव्हाण ,ताराचंद कराळे , जयसिंग एरंडे अनिल नवले , विजय पवार , भगवान शेळके , संदिप सातव , माजी पंचायत समिती सदस्य सदस्य विक्रम पाचुंदकर,घोडगंगा कारखान्याचे माजी उपाध्यक्ष दादापाटील फराटे , माउली साकोरे , सुरेश थोरात आदी उपस्थित होते . यावेळी बोलताना लांडगे म्हणाले की विशेष जन अभियान अंतर्गत ९ कार्यक्रम घेण्यात येणार आहेत .या अभियान अंतर्गत समाजातील विविध स्तरातील नागरिकांशी चर्चा व्यापारी वर्ग , शासनाच्या योजनाचे लाभार्थी व ज्येष्ठ्य नागरिकांचे समेंलन होणार आहे . त्याच बरोबर अभियाना अंतर्गत नागरिकांच्या दृष्टीने महत्वाच्या असणारे शासनाचे निर्णय व योजना याची माहिती देण्यात येणार आहे . गतीमान सरकार व भ्रष्टाचार मुक्त सरकार अशी ओळख मोदी सरकारची असल्याचे सांगत देशाची जगभरात प्रतिष्ठा उंचावण्याचे काम पंतप्रधान मोदी यांनी केल्याचे लांडगे यांनी सांगितले ..पंतप्रधान आवास योजने अंतर्गत सव्वा तीन कोटी पक्की घरे बांधण्यात आली असुन आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत लोकांच्या आरोग्याचा विचार करण्यात आला आहे .९३०० जनऔषधी केंद्र सुरु करण्यात आले आहे .आर्थिक दुर्बल घटकांसाठी आरक्षण देण्यात आले .५३ हजार कि. मी हुन आधिक अंतराचे रस्ते तयार करण्यात आले .१५ शहरात मेट्रो सुरु झाल्याचे ते म्हणाले ..सर्व सामान्याना केंद्र बिंदु मानुन सरकार काम करित आहे .शिरुर लोकसभा मतदार संघात अष्टविनायक महामार्गा शिवाय अनेक रस्त्याची कामे मार्गी लावण्यात आल्याचे लांडगे म्हणाले .पुणे नाशिक हायवेचे रखडलेले काम ही मार्गी लावण्यात आल्याचे लांडगे म्हणाले .. यावेळी प्रास्ताविक जिल्हा सरचिटणीस ॲड धर्मेंद्र खांडरे यांनी केले . फोटो ओळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळास नउ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल विशेष जन अभियान मध्ये बोलताना आमदार महेश लांडगे .