शिरुर दिनांक ( वार्ताहर ) शिरुर तालुक्यातील तब्बल २७ शाळांच्या दहावीच्या निकाल 100% लागला असुन परीक्षेला बसलेल्या एकूण ६५०४ विद्यार्थ्यांपैकी ६२७५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असुन तालुक्याचा निकाल ९६.४७% इतका लागल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी अनिल बाबर यांनी दिली . तालुक्यात एकूण ६५२२ विद्यार्थ्यानी परीक्षेसाठी नोंदणी केली होती त्यातील ६५०४ विद्यार्थ्यानी परीक्षा दिली त्यात डिस्टीशन मध्ये 2226 , प्रथम श्रेणीत २३७६ तर द्वितीय श्रीणीत १३३२ तर पास श्रेणीत ३४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असुन शिरुर शहरातील आयेशा बेगम उर्दु हायस्कुल , विजयमाला विद्यामंदिर ,रसिकलाल माणिकचंद धारीवाल इंग्लिश स्कुल ,ज्ञानगंगा विश्वविद्यालय ,यांचा निलाल १००% लागला . तर तालुक्यातील ज्ञानवर्धिनी विद्या मंदिर तळेगाव , कारेश्वर इंग्लिश मिडियम , अंजिक्यतारा इंग्लिश स्कुल , जिजामाता इंग्लिश मिडियम स्कुल ,आरएमदी सिंहगड स्प्रिंग स्कुल कोंढापूरी ,श्री पदमणी इंग्लिश मिडियम स्कुल ,आर डी पलांडे आश्रमशाळा मुखई ,फ्रेंडस एज्युकेशन कोरेगाव ,विद्याधाम प्रशाला कान्हूर मेसाई , संभाजीराव पलांडे प्रगती हायस्कुल मुखई , स्वातंत्र्य सैनिक शंकरराव बाजीराव डावखरे विद्यालय , गुरुनाथ विद्यालय वडनेर , कालीमाता विद्यालय वाघाळे , अभिनव विद्यालय सरदवाडी , तात्यासाहेब सोनवणे विद्यालय निर्वी , के. पी गदादे विद्यालय तांदळी , न्यु इंग्लिश स्कुल भांबर्डे , श्री संभाजीराजे विद्यालय जातेगाव , आदर्श विद्यालय वरुडे , एकता विद्यालय करंजावणे , आबासाहेब पाचंगे विद्यालय ढोकसांगवी , आरएमडी विद्यालय गणेगाव ,पांडुरंग विद्यालय विठ्ठलवाडी या शाळांच्या निकाल ही १००% लागला. शिरूर येथील रेव्हन्यु कॉलनीतील वेदपाठक कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट मध्ये दहावीचा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी केली होती विनामूल्य निकाल पाहण्याची व निकालाची प्रिंट देण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती प्रा वेदपाठक यांनी दिली . फोटो ओळी दहावीचा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी केलेली गर्दी. .