पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्याकडून हजारे कुटुंबियांचे सांत्वन..

पाचोड /

पैठणचे माजी वनपरिक्षेत्र मंडळ अधिकारी सुखदेव हजारे व पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक परसराम हजारे यांचे वडील देवराव रामभाऊ हजारे (वय१०२वर्ष)रा.कुतुबखेडा ता.पैठण यांचे वृद्धापकाळाने दु:खद निधन झाले, या घटनेमुळे हजारे कुटुंबियांना दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

 त्यामुळे राज्याचे रोहयो मंत्री तथा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान पाटील भुमरे यांनी हजारे कुटुंबीयांच्या घरी जाऊन भेट घेऊन सांत्वन केले.यावेळी पालकमंत्री संदीपान पाटील भुमरे यांनी आपण हजारे कुटुंबियांच्या दुःखात खंबीरपणे पाठीशी उभे आहोतच या बरोबरच हजारे कुटुंबियांशी असलेल्या अनेक जुन्या आठवणींना यावेळी उजाळा दिला. तालुक्यातील प्रत्येक व्यक्ती हि आपल्या कुटुंबातीलच सदस्य असून सुख दुःखाच्या काळात प्रत्येक कुटुंबाला आधार देण्याचे काम भुमरे कुटुंबियांकडून निरंतर होत राहणार असल्याची भावना व्यक्त केली. 

यावेळी कृषी बाजार समितीचे सभापती राजू नाना भुमरे,उपसभापती राम एरंडे, संचालक भगवान कारके,माजी सभापती नंदू पठाडे, दुध महासंघाचे संचालक नंदू आन्ना काळे,सपोनि संतोष माने, डॉ.रामेश्वर हजारे,सरपंच विठ्ठल पठाडे, सोसायटीचे संचालक सुनिल पठाडे, विठ्ठल शिंदे, अंकुश राऊत,लक्ष्मण खराद,सतिश हजारे,राम एडके, एकनाथ हजारे सह आदी जणं उपस्थित होते.