शिरुर दिनांक ( वार्ताहर ) पुणे नगर महामार्गावर कमल सीएनजी पंपाचे उद्घघाटन करण्यात आले . बबनराव मोरे व संतोष बबनराव मोरे यांनी शिरुर शहरा जवळील पुणे नगर महामार्गावर बो -हाडे मळा नजीक कमल सीएनजी या पंप सुरु केला असुन या पंपाचे मान्यवरांच्या उपस्थितीत उदघाटन करण्यात आले . यावेळी आमदार ॲड .राहुल कुल , माजी आमदार पोपटराव गावडे , पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद , घोडगंगा साखर कारखान्याचे माजी संचालक पांडुरंग थोरात , सौ कमलबाई बबनराव मोरे ,पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल बाबूराव पाचर्णे , घोडगंगा कारखान्याचे माजी उपाध्यक्ष दादापाटील फराटे , तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे ,जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शेखर पाचुंदकर , बाजार समितीचे माजी सभापती शशिकांत दसगुडे , माजी उपनगराध्यक्ष जाकिरखान पठाण , माजी पंचायत समिती सदस्य आबासाहेब सरोदे , शिरुर शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष सुकुमार बोरा , शिरुर गृप सोसायटीचे अध्यक्ष आप्पासाहेब वर्पे ,माजी उपसरपंच बाबाजी वर्पे , गणेश खोले , शिरुर मुद्रक संघटनेचे अध्यक्ष बाबुराव पाचंगे ,आखिल भारतीय मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष श्यामकांत वर्पे , प्रवासी संघाचे अनिल बांडे , उल्हास साखरे ,माजी सरपंच प्रकाश थोरात ,राहुल बोथरा , दौलतराव खेडकर , राहुल पवार, चंद्रकांत कर्डिले , सतीश कर्डिले ,पंकज जाधव , सागर नरवडे , मुकेश पाचर्णे  टिकुशेठ ओस्तवाल   उपस्थित होते . ज्येष्ठय नेते बबनराव मोरे हे प्रामाणिक व सचोटीने वागणारे असुन राजकारणा पलिकडे जावुन त्यानी सर्वांशी सौहार्दाचे संबंध जोपासल्याची भावना अनेक मान्यवरांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी प्रास्ताविक पांडुरंग थोरात यांनी केले. स्वागत बाजार समिती व खरेदी विक्री संघाचे संचालक संतोष बबनराव मोरे व तर्डोबावाडीच्या सरपंच धनश्री संतोष  मोरे यांनी केले . त्यात त्यानी पुणे नगर महामार्गावर कमल सीएनजी नावाने पंप सुरु केले असल्याचे सांगितले . यावेळी आमदार कुल , माजी आमदार गावडे , व जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष कंद घोडगंगा कारखान्याचे माजी उपाध्यक्ष फराटे आदीनी शुभेच्छा दिल्या . सुत्रसंचालन रावसाहेब चक्रे यांनी केले . मोरे यापुर्वी बांधकाम व्यवसाय व रिअल इस्टेट व्यवसायात कार्यरत होते व कमल सीएनजी पंप या द्ववारे त्यांनी सीएनजी पंप व्यवसायात पदार्पण केले आहे .