शिरुर दिनांक ( वार्ताहर )शिरुर शहरातील लाटेआळी तील कबरस्थान मधील वजुखाना व अंतर्गत रस्त्याकरिता ६० लाख रुपयेचा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल असे आश्वासन शिवसेनेचे नेते व माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी दिले . शिरुर येथील कब्रस्थानातील सीमाभिंतीच्या कामाचे भुमीपूजन आढळराव यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी   माजी नगराध्यक्ष नसीम खान , जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहूल बाबूराव पाचर्णे , माजी नगराध्यक्षा  उज्जवला बरमेचा , शिवसेनेचे  बापूसाहेब शिंदे ,अनिल काशीद , शहरप्रमुख  मयूर थोरात , माजी नगरसेविका  अंजली थोरात , ज्योती लोखंडे , रोहीणी बनकर , विठ्ठल पवार , इक्कबालभाई सौदागर , सिकंदर मण्यार ,    हुसेन शहा आदी यावेळी उपस्थित होते . यावेळी बोलताना आढळराव यांनी सांगितले की मागील ६ महिन्यात शासनाच्या माध्यामातुन शिरुर लोकसभा मतदार संघात ७०  कोटी रु हुन आधिक रक्कमेची विकासकामे आणली आहेत .मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे समाजातील सर्व घटकांसाठी विविध विकास योजना राबवित असल्याचे त्यांनी सांगितले शिरुर शहरातील विविध  विकासयोजनेच्या कामांची माहिती त्यांनी दिली . यावेळी प्रास्ताविक अल बैतुल माल कमिटीचे  फिरोज बागवान यांनी केले .यावेळी त्यांनी आमदार कै .बाबूराव पाचर्णे यांनी शिरुरच्या कब्रस्थानत केलेल्या विकासकामांची माहिती दिली त्याच बरोबर वजूखाना व कब्रस्थानातील अंतर्गत रस्त्याच्या कामासाठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली .