शिरुर दिनांक ( ) रांजणगाव एमआयडीसी परिसरात मोबाईल चोरी करणा- या सराईतास पोलीसानी जेरबंद केले आहे. विक्रांत विलास रोकडे रा .आंबळे , ता शिरुर , जि पुणे असे त्यांचे नाव असुन शिरुर न्यायालयाने दिनांक २६ मे २०२३ पर्यत पोलीस कोठडी सुनावली असल्याचे पोलीस निरीक्षक बळवंत मांडगे यांनी संगितले . रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणावर औद्योगीक वसाहत असल्याने कामानिमित्ताने आलेल्या कामगारांना विशेष लक्ष करुन त्यांचे मोबाईल चोरीच्या घटना घडल्याने पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे यांनी तपास पथकाला सूचना देवून मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सुचना दिलेल्या होत्या. त्या अनुषंगाने तपास पथकातील सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे, विजय शिंदे यहे आरोपीच्या मागावर होते. २७ एप्रिल २०२३ रोजी रांजणगाव पार्किंगजवळील पत्र्याचे शेडमधून कमल बीमल सरकार यांचा एक विवो कंपनीचा व एक ओप्पो कंपनीचा मोबाईल चोरीस गेला होता. तसेच दि. ५ मे 2023 रोजी गणेश मिलिंद पट्टेबहादुर यांच्या खोलीमधून त्यांचा एक मोबाईल चोरीस गेला होता. 14 मे 2023 रोजी राजकांत निळाराम ठाकरे यांचा ओपो कंपनीचा मोबाईल चोरीस गेला होता. सदरच्या मोबाईल चोरीच्या लागोपाठ घटना घडल्याने तपास पथक आरोपीचा कसून शोध घेत असतांना तपास पथकाने आरोपी विक्रांत विलास रोकडे रा. आंबळे, ता. शिरुर, जि. पुणे यास ताब्यात घेवून तपास केला असता त्याने सुरवातीस उडवा- उडवीची उत्तरे दिली. परंतु त्यास पोलीस खाक्या दाखविताच त्याने वरील तिन्ही गुन्हयांची कबुली देत दोन विवो कंपनीचे, दोन ओप्पो कंपनीचे, एक मोटो कंपनीचा व एक स्मार्ट वॉच असे एकुण 32,000/-रु. किंमतीचे पाच मोबाईल व स्मार्ट वॉच काढून दिले . सदरचे मोबाईल व स्मार्ट वॉच जप्त करण्यात आले आहे.विक्रांत रोकडे यास अटक करण्यात आलेली असून न्यायालयाने दि. 26/05/2023 राजी पर्यंत पोलीस कस्टडी सुनावली असल्याचे पोलीसांनी सांगितले . सदर मोबाईल चोरी प्रकरणी तिन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आलेले असून सदर गुन्हयाचा पुढील अधिक तपास पोलीस हवालदर संदिप जगदाळे, वजनाथ नागरगोजे व पोलीस नाईक राजेश ढगे हे करत आहेत. ही कामगिरी पोलीस अधिक्षक अंकित गोयल , अप्पर पोलीस अधिक्षक मितेश गट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे, दत्तात्रय शिंदे , विजय शिंदे, विलास आंबेकर, संदिप जगदाळे, वैजनाथ नागरगोजे, माणिक काळकुटे व राजेश ढगे यांनी केली आहे.