शिरुर दिनांक ( वार्ताहर ) शिरुर नगरपरिषदेत मंगळवार दिनांक ३० मे रोजी शासन आपल्या दारी या अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय आधिकारी तथा नगरपरिषदेचा प्रशासक स्नेहा किसवे - देवकाते व मुख्याधिकारी ॲड प्रसाद बोरकर यांनी दिली . बोरकर यांनी सांगितले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासकीय योजना सुलभीकरण अभियान शासन आपल्या दारी याचा निर्धारा नुसार जलद व शासकीय निर्धारीत शुल्कात योजनेचा लाभ देणे. पहिल्या टप्यात प्रत्येक जिल्ह्यात किमान ७५,००० लाभार्थ्यांना विविध सरकारी योजनांचा लाभ उपलब्ध करुन देण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. शासन आपल्या दारी या अभियानांतर्गत नगरपरिषद सर्व विभागाची राबविण्यात येणा-या सेवा देण्यात येणार आहेत. नागरीकांनी सर्व कामांसाठी आवश्यक असणारे अर्ज व कागदपत्रे जोडून दि.२८ मे २०२३ पर्यंत कार्यालयीन वेळेत शिरुर नगरपरिषद नवीन प्रशासकीय इमारत येथे जमा करावेत जेणे करुन सेवा तातडीने देता येतील असे आवाहन ही बोरकर यांनी केले आहे .तसेच अशाच प्रकारे सदर कालावधीत इतर शासकीय विभाग देखील त्यांचे कडील योजना व उपक्रम याचा लाभ नागरिकांना उपलब्ध करुन देणार आहेत. तरी आपल्या शासकीय कामाबाबत अधिक माहिती करीता त्या त्या विभागाशी संपर्क साधणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले . शासन आपल्या दारी हा कार्यक्रम मंगळवार दि. ३० मे २०२३ रोजी सकाळी १०.०० पासून ते दुपारी ४.०० वाजेपर्यंत शिरुर नगरपरिषद मंगल कार्यालयात होणार आहे स्नेहा किसवे - देवकाते, प्रशासक शिरुर नगरपरिषद तथा उपविभागीय अधिकारी, उप विभाग पुणे-शिरुर यांचे मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन सर्व नागरिकांना अभियानाचा लाभ घेणेचे आवाहन मुख्याधिकारी बोरकर यांनी केले आहे . या अभियानात झोन दाखला देणे, भाग नकाशा देणे ,बांधकाम परवाना देणे , कर उतारा देणे ,थकबाकी नसल्याचा दाखला देणे , दस्तऐवजाच्या आधारे मालमत्ता हस्तांतरण नोंद प्रमाणपत्र देणे , वारसा हक्काने मालमत्ता हस्तांतरण नोंद प्रमाणपत्र देणे , मालकी हक्कात बदल करणे, नविन नळ जोडणी देणे , नविन जोडणी आकारामध्ये बदल करणे, मालकी हक्कात बदल करणे • तात्पुरते / कायम स्वरुपी नळजोडणी खंडीत करणे ,पुर्नजोडणी करणे , वापरामध्ये बदल करणे ,पाणी देयके तयार करणे,भोगवटा प्रमाणपत्र देणे,जलनि:सारण जोडणी देणे , रस्ता खोदाई परवाना देणे, जन्म प्रमाणपत्र देणे ,मृत्यु प्रमाणपत्र देणे नोंद नसल्याचा दाखला देणे, जन्म मृत्यु रजिस्टराचा उतारा देणे, व्यापार व्यवसाय साठा करणेसाठी ना हरकत प्रमाणपत्र देणे, मंडपासाठी ना हरकत प्रमाणपत्र देणे ,नविन व्यवसाय परवाना देणे ,परवान्याचे नुतनीकरण करणे ,अग्निशमन ना हरकत दाखला देणे • अग्निशमन अंतिम ना हरकत दाखला देणे,सांडपाणी चेंबर साफ करणे , सेप्टीक टॅन्क साफ करणे , वृक्ष छाटनी परवानगी • वृक्ष तोड तक्रारी, आदी कामे या अभियानात मार्गी लावली जाणार असल्याचे मुख्याधिकारी बोरकर यांनी सांगितले .