शिरुर दिनांक (वार्ताहर ) उच्च प्रतीचे राजकारण करावे असे आवाहन करत सर्वसामान्याच्या कुटुंबातील मुलानी राजकारणात सहभाग वाढवावा असे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर शिरुर येथे म्हणाले . राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध राजकीय पक्ष संघटना यांच्या वतीने त्यांच्या सन्मान शिवसेवा मंडळाचा सभागृहात करण्यात आला .. राज्य अध्यक्ष काशिनाथ शेवते , महासचिव माउली सलगर , जिल्हाध्यक्ष विनायक रुपनवर ,माजी नगराध्यक्षा मनिषा गावडे , ॲड .अपेक्षा कु -हाडे , स्वप्ना मलगुंडे , माजी सरपंच जगदीश पाचर्णे , अमोल देवकाते , संजय बारहाते , अजित पाटील माजी पंचायत समिती सदस्य रामभाउ कदम, सिकंदर पटेल संदिप देवकाते वाल्मिक क - हे , राजु पुणेकर , नितीन धरणे , भीमराज क-हे ,राजु थोरात , संजीव थोरात , सतीश क -हे अमित खांडेकर ,गोविंद क -हे ,किरण किरवे , वाल्मिक क-हे , चेतना पिंगळे आदी यावेळी उपस्थित होते . जानकर म्हणाले की शेतक -यांची मुले प्रशासकीय आधिकारी झाली पाहीजेत. केवळ शेती न करता उद्योग व्यापारात उतरा असे आवाहन त्यानी केले . कोणत्याही पक्षावर टीका करणार नाही तर माझी लाईन मोठी करेल . शेतक -यांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे .महापुरुषाचे विचार आत्मसात करावे सुज्ञ डोळ्याने चला . युवकांनी व्यसनापासून दूर रहावे असे आवाहन त्यांनी केले स् . खोट्या प्रतिष्ठेत अडकु नका असे ही ते म्हणाले . शिरुर मधील पत्रकारासाठी पत्रकार भवन उभारण्यासाठी सर्वोपतरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यानी दिले . राज्य अध्यक्ष काशीनाथ शेवते म्हणाले की जातनिहाय जनगणना झाली पाहीजे रासप राज्यभर वाढत आहे . दिल्ली येथे विविध स्पर्धा परीक्षाची तयारी करणा-या विद्यार्थ्यांसाठी माजी मंत्री महादेव जानकर वसतिगृह उभे करीत आहे . रासप देशात मोठी भरारी घेईल .येणा- या सर्व निवडणुका आगामी काळात पक्ष स्वबळावर लढेल. यावेळी प्रास्ताविक राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुकाध्यक्ष शिवाजी कु-हाडे यांनी केले सुत्रसंचालन गोरख डुबे यांनी केले . फोटो ओळी शिरुर येथे बोलताना माजी मंत्री महादेव जानकर