पती-पत्नी कर्जबाजारीपणा कंटाळून आत्महत्या..
"पैठण तालुक्यातील सालवडगाव येथील धक्कादायक घटना"
पाचोड/कर्ज बाजारीपणाला कंटाळून पती-पत्नीने विहिरीत उडी घेऊन जीवन यात्रा संपवल्याची धक्कादायक घटना पैठण तालुक्यातील सालवडगाव येथे मंगळवारी (दि.१६)रोजी सायंकाळी साडे आठच्या उघडकीस आली असून देविदास बाबुराव पाचे (वय ४०),मीरा देविदास पाचे(वय ३५) असे आत्महत्या करणाऱ्या पती पत्नीचे नाव आहे.
याविषयी पोलिसांकडून मिळालेली माहिती नुसार,सालवडगाव या.पैठण येथील देविदास पाचे त्यांच्या पत्नी मीरा पाचे यांनी शेतीसाठी बँकेकडून त्याचबरोबर खाजगी सावकाराकडून कर्ज घेतले होते. मात्र यंदा कापसाला भाव नाही. त्यात अतिवृष्टीचा फटका, त्यामुळे शेतकऱ्याच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. खत बियाणावरती लाखो रुपये खर्च करून हातात एक रुपया आला नाही. काढलेले कर्ज फेडायचे कसे या विवंचनेत हे पती-पत्नी अनेक दिवसापासून होते. खाजगी सावकार देखील दररोज त्यांच्या दारावरती पैशासाठी तकदा लावत होते. त्यामुळे दोघेही पती-पत्नी सध्या मानसिक त्रासात होते. सोमवार पासून हे दोघेही घरी नव्हते. मंगळवारी सायंकाळी या पती-पत्नीचा सालवडगाव शिवारात एका विहीरीत मृतदेह आढळून आला आहे.
गावातील एका शेतकरी देविदास पाचे यांच्या शेता जवळून जात असताना त्यांनी अचानक विहिरीत डोकावून बघितले असता त्यास देविदास बाबुराव पाचे व मीरा देविदास पाचे यांचे प्रेत विहिरीत तरंगत असल्याचे दिसून आले. यावेळी त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती गावकऱ्यांना कळविले असता त्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन या घटनेची माहिती पाचोड पोलीस ठाण्यात दिली यावेळी पाचोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत सुतळे, सुधाकर मोहिते, प्रशांत नांदवे, यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन गावकऱ्यांच्या मदतीने मंगळवारी रात्री साडेदहाच्या दरम्यान या पती-पत्नीचा मृतदेह विहिरी बाहेर काढला.या घटनेची माहिती मिळतात पैठण विभागाचे उपविभागीय अधिकारी डॉ.विशाल नेहुल यांनी घटनास्थळी भेट दिली.देविदास पाचे व मीरा पाचे मृत्यू देह विहीरीच्या बाहेर काढून उतरणीय तपासणी साठी पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दोघांनाही मृत घोषित करून बुधवारी सकाळी दोघांचीही उतरणीय तपासणी करण्यात आली. या घटनेची नोंद पाचोड पोलीस ठाण्यांत करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शना खाली पाचोड पोलीस करीत आहेत.