शिरूर शहरातील रामलिंग जवळ महिलेने केलेल्या आत्महत्या प्रकरणाला आता वेगळे मिळाले असून हे प्रकरण मॅनेज करण्यासाठी खंडणी मागितल्याप्रकरणी शिरूर तालुक्यातील एका उद्योजकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

याबाबत काळूराम दशरथ मलगुंडे रा. ढोकसांगवी यांनी शिरूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार,रामलिंग येथे फिर्यादी यांचे पुतणे योगेश मलगुंडे यांची मैत्रीण अंजली गायकवाड हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती.यावेळी संदीप कुटे हा त्या ठिकाणी गेला होता.यावेळी संदीप कुटे याने अंजली गायकवाड हिने लिहिलेली सुसाईड नोट असलेली डायरी गुपचूप घेऊन स्वतःकडे ठेवली व ही डायरी पोलिसांना दिली असल्याचे फिर्यादी यांना खोटी माहिती दिली.तसेच पोलीस व पत्रकारांना मॅनेज करावे लागेल असे सांगितले.

आरोपी संदीप कुटे याने पोलिस व पत्रकारांची भीती घालून सदर डायरी मध्ये योगेश मलगुंडे यांचे नाव आहे, तसेच हॉस्पिटलचे बिल भरायचे असून ३० हजार रुपये फिर्यादी यांचेकडून ऑनलाईन घेतले. व्हॉटस्अप कॉल करून योगेशला वाचवायचे असेल तर १० लाख रुपये जमा करा असे सांगत खंडणीची मागणी केली असल्याचे फिर्यादी यांनी तक्रारीत म्हटले आहे.

या प्रकरणी शिरूर पोलिसांनी आरोपी संदीप कुटे याच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी पुढील तपास शिरूर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक संदीप यादव हे करत आहेत.