क्षुल्लक कारणावरून एकाचा चाकूने भोसकून खून; एक संशयित ताब्यात,दोन मुख्य आरोपी फरार.
छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद तालुक्यातील टाकळी राजेराय येथे माझ्या वडीलाला दारु का पाझली म्हणत एकाचा चाकुने भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना घडली असून बबन कुचे असे मयताचे नाव आहे. या घटनेमुळे टाकळी राजेराय परिसरात खळबळ उडाली आहे.
मयत बबन कुचे यांच्या पत्नीच्या फिर्यादीवरून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. बबन कुचे हे आपल्या घरी असताना करण नामदेव बनकर व सुरज (टगा) नामदेव बनकर या दोघे सख्ख्या भावांनी माझ्या वडीलाला दारु का पाझली म्हणत बबन कुचे यांच्यावर काठी कुऱ्हाडीने हल्ला केला व नंतर चाकू भोसकुन खून केला. दरम्यान बबन कुचे यांना जख्मी अवस्थेत खुलताबाद येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलिस उप विभागीय अधिकारी मुकुंद आघाव यांनी ग्रामीण रुगणालयात जाऊन मयत बबन कुचे यांची पाहणी केली. पोलिसांनी
संशयावरून आरोपींच्या वडीलाला ताब्यात घेतले असून,दोन मुख्य आरोपी फरार आहेत.