वैजापूर येवला रोडवर कार व दुचाकीच्या अपघातात एक २० वर्षीय तरुण ठार. वैजापूर :- भरघाव वेगाने येणाऱ्या कारने दुचाकी स्वारास जोरदार धडक दिली या धडकेत एक २० वर्षीय तरुण जागीच ठार झाला. येवल्या कडुन येणारी कार क्रमांक एम एच ४१ बी एच ६१३२ हिने मोटरसायकल क्रमांक एम एच २० बी सी १२७८ हिस जोरदार धडक दिल्याने सुशिल राजेंद्र चव्हाण हा डोक्याला मार लागल्याने गंभीर जखमी झाला होता त्याला तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यातआले असता डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले या प्रकरणी वैजापूर पोलिसांत अपघाताची नोंद करण्यात आली.