राष्ट्रवादी च्या महिला कार्यकर्त्या अनिता वानखडे यांच्या विरोधात विभागीय आयुक्त कार्यालयसमोर अ.भा.आ. को.स. संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रमेश बावस्कर यांचे उपोषण..
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी)
पैठण तालुक्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनिता वानखेडे या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पैशासाठी ब्लॅकमेल करत आहे त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावे यासाठी (दि.10 रोजी) सकाळी विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगरच्या कार्यालयासमोर अखिल भारतीय आदिवासी कोळी समाज संघटनेचे छत्रपती संभाजीनगर जिल्हा अध्यक्ष रमेश बावस्कर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनिता वानखेडे यांच्या विरोधात आमरण उपोषण सुरू केले आहे.
पैठण तालुक्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुका अध्यक्ष म्हणून अनिता वानखडे यांची काही वर्षा अगोदर नियुक्ती करण्यात आली होती. मात्र,त्या. स्वताच्या फायदयासाठी पक्षाचा उपयोग करून पक्षाची प्रतिमा मलिन करत असल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना सहा वर्षे पक्षातून निलंबित करण्यात आले असतांनी त्या स्वतःला पैठण तालुका महिला अध्यक्ष म्हणून फिरत आहेत. पक्षाच्या नावावर त्यांनी अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या खोट्या तक्रारी पक्षाच्या लेटर हेड वरती दिलेल्या आहे.तसेच अनिता वानखेडे यांनी "आम्ही वाचक" हा साप्ताहिक काढला असून त्याची नोंदणी दिल्ली येथील कार्यालयात आहे का ? त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयमध्ये या साप्ताहिकाची नोंदणी केलेली आहे का ? याची चौकशी करावी वानखेडे या पैठणचे तत्कालीन तहसीलदार शेळके यांच्या कुटुंबाची बदनामी "आम्ही वाचक" या साप्ताहिकात जानू- बुजून करत आहे. या साप्ताहिकाची चौकशी करून अनिता वानखेडे यांच्या वरती फसवणुकीचा तसेच खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी अखिल भारतीय कोळी आदिवासी समाज संघटना छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा अध्यक्ष रमेश बावस्कर आमरण उपोषण सुरू केले आहे