करिअर कट्टा-राज्यस्तरीय यूपीएससी समिती अध्यक्षपदी प्राचार्य डॉ. चंद्रसन कोठावळे यांची निवड
पाचोड विजय चिडे - महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या करिअर कट्टा या उपक्रम अंतर्गत राज्यस्तरीय यूपीएससी समितीची स्थापना करण्यात आली, त्या समितीच्या अध्यक्षपदी शिवछत्रपती महाविद्यालय पाचोड , जि. छत्रपती संभाजीनगर येथील प्राचार्य डॉ. चंद्रसेन कोठावळे यांची नियुक्ती झाल्याचे पत्र महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष डॉ. यशवंत शितोळे यांनी महाविद्यालयाला दिले. महाराष्ट्र राज्य माहिती तंत्रज्ञान करियर कट्टा या उपक्रमा अंतर्गत महाविद्यालय युवक व युवती विद्यार्थ्यांना विविध शासकीय, प्रशासकीय सेवा तसेच तरुण उद्योजक तयार व्हावेत यासाठी प्रामुख्याने हा उपक्रम राज्यात २०२० - २१पासून चालवला जातो. राज्यस्तरीय उत्कृृष्ट प्राचार्य म्हणून दोन वेळा पुुस्कार मिळविणारे प्राचार्य डॉ. चंद्रसेन कोठावळे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील करियर कट्टाचे समन्वयक आणि त्यांच्या संघाने नुकतेच सहा पारितोषिके पटकावण्याचा बहुमान मिळविलेला आहे. रू पन्नास हजार रोख पुरस्कार राशीसह एकूण सहा पारितोषिके मिळवणारे शिवछत्रपती महाविद्यालय हे महाराष्ट्रामध्ये एकमेव ठरले आहे. या राज्यस्तरीय यूपीएससी समिती ही प्राचार्य डॉ.चंद्रसेन कोठावळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे कार्य चालेल तसेच विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन व ऑफलाईन मोडमध्ये विविध प्रमुख व्याख्याते आणि उद्योजक यांच्या माध्यमातून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे, नवीन अभ्यासक्रम तयार करणे, विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन करणे आदी कामे या समिती अंतर्गत होणार आहेत. मत्स्योदरी शिक्षण संस्था जालना येथे गेली 37 वर्ष वाणिज्य विभागामध्ये कार्यरत असणारे प्राचार्य डॉ. कोठावळे यांना मत्स्योदरी सेवा गौरव पुरस्काराने ही सन्मानित करण्यात आले आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री तथा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री नामदार संदिपान भुमरे, ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे संस्थाध्यक्ष राजू नाना भुमरे , छत्रपती संभाजी नगरचे जिल्हा परिषदचे माजी सभापती विलास भुमरे पाचोडचे सरपंच शिवराज भुमरे तसेच परिसरातील नागरिक, प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचाऱी व विद्यार्थी यांनी प्राचार्य डॉ. चंद्रसेन कोठावळे यांचे अभिनंदन केले.